खडेगोळवलीत शिवजयंतीची परंपरा ३२ व्या वर्षीही कायम कै.रमेश राजाराम तरे फाऊंडेशन आयोजित शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

■नगरसेवक विक्की तरे आणि मोनाली तरे यांनी जपलाय ३२ वर्षांचा वारसा शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचा ५०० जणांनी घेतला लाभ..


कल्याण : खडेगोळवलीत शिवजयंतीची परंपरा ३२ व्या वर्षीही कायम असून कै.रमेश राजाराम तरे फाऊंडेशन आयोजित शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी झाली. नगरसेवक विक्की तरे यांनी त्यांच्या वडिलांनी सुरु केलेला ३२ वर्षांचा वारसा जपला असून शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा ५०० हून अधिक जणांनी लाभ घेतला. या मिरवणुकीत नगरसेवक विक्की तरे, नगरसेविका मोनाली तरे, समाजसेवक मयुरेश तरे, विशाल तरे, चंद्रकांत मोटे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


श्रीराम सिनेमा चौक येथून बॅण्डच्या तालावर निघालेली मिरवणूक संपूर्ण खडेगोळवली प्रभागात नेण्यात आली. या मिरवणुकीत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले शिवराज रथात विराजमान झाले होते. त्यांच्या सोबत मावळे देखील होते. त्याचप्रमाणे बालशिवाजी घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीची शोभा वाढवत होते. महिला देखील पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे शिवरायांनी ज्या रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली तो देखावा देखील चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला.


शिवरायांची शिवजयंती उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते.  सालाबादप्रमाणे यंदाही खडेगोळवलीमध्ये कै.रमेश राजाराम तरे फाऊंडेशनच्या वतीने  शिवरायांची मिरवणूक काढून जयंती साजरी केली. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ५०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक विक्की तरे यांनी दिली.    

Post a Comment

0 Comments