साद फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिलाई प्रशिक्षण जिल्हा नियोजन समितीच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून उपक्रम


कल्याण, प्रतिनिधी  : जिल्हा नियोजन समितीच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून कल्याणमध्ये साद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना शिलाई प्रशिक्षण व शिवण यंत्र वाटपाच्या उपक्रमाची आज सुरवात करण्यात आली. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखेत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  शिवसेना उपशहर संघटिका, साद फाउंडेशनच्या आशा रसाळ आणि भारती जाधव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.           महाराष्ट्र शासनच्या जिल्हा नियोजन समिती, ठाणे
अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत नाविन्य पूर्ण योजना
"शिवण प्रशिक्षण व शिवण यंत्र वाटप" उपक्रम राबविला जात असून यामध्ये अनुसूचित प्रवर्गातील गरीब, गरजू व विधवा महिलांना ही योजना  लाभदायी आहे. लाभार्थी महिलेस १० दिवस मोफत शिवण यंत्र व प्रशिक्षण. (चहा/नाष्टा), लाभार्थी महिलेस शिवण यंत्र वाटप. 


             लाभार्थी महिलेचा व कुटुंबाचा १ वर्षाचा आरोग्य विमा मोफत.  लाभार्थी महिलेस शिवण यंत्र व टूल किट. लाभार्थी महिलेस १ वर्ष देखभाल व साहित्य. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी. लाभार्थी महिलेस या सर्व सुविधापूर्ण तथा मोफत
देण्यात येणार आहेत.


           कल्याण पूर्वेत आज या उपक्रमाला सुरवात करण्यात आली असून यावेळी जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सहसंपर्क प्रमुख कल्याण पूर्व विधानसभा शरद पाटील, उपशहर संघटक हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेविका माधुरी काळे, विधानसभा संघटिका राधिका गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments