लपोषण पंधरवड्या निमित्ताने एकात्मिक बालविकास प्रकल्प कल्याण विभागाची व्यापक जन जागृती मोहीम

 


कल्याण  :-  एकात्मिक बालविकास प्रकल्प कल्याण विभागाच्या वतीने  पोषण आहाराबाबत   जनजागृती  पंधरवडा  उपक्रम राबविण्यात येत असून रविवारी कल्याण ,शहाड, टिटवाळा रेल्वे स्टेशन , लोकल प्रवासा दरम्यान  आंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पोषण आहाराबाबत जनजागृती करीत सकस आहाराचे महत्त्व उपस्थितीतांना पटवून दिले. 

            
 
          बालविकास प्रकल्प (नागरी) कल्याण प्रकल्प आधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनुसार कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील १७३ आगंणवाडी क्रेंन्द्राच्या सात बीट अंतर्गत आंगणवाडी शिक्षिका,सेविका यांच्या माध्यमातून २१मार्च ते ४ एप्रिल या पंधरावड्यात  पोषण पंधरवडा साजरा करण्यात येत असून  २१ मार्च रोजी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थायीसमिती दालनात पोषण पंधरवडा उपक्रमाचे औपचारिकता उद्घघाटन करीत सकस आहाराचे महत्त्व जनजागृती मोहीम सुरुवात  करण्यात आली. 


            अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. 


        अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात. या बाबत पोषण पंधरवड्यात व्यापक जन जागृती सुरू असुन        त्याच अनुषंगाने रविवारी बीट क्रं. ७ काळातलाव विभागाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कल्याण ते टिटवाळा स्टेशन वर  तसेच लोकल ट्रेनमध्ये  मुख्यसेविका अस्मिता मोरे  यांच्या मार्गदर्शना खाली पोषण आहाराबत तसेच बालकांं मधील कुपोषित पणा बुटके पणा कसा कमी करता येईल स्त्रियां, किशोरी मुलींमधील अँनिमियाचे प्रमाण  कमी झाले पाहीजे या बद्दल जनजागृती केली.


          पोषण आहारांचे महत्त्व उपस्थितांना आगंणवाडी सेविका शिल्पा बावकर,मंजिरी सकपाळ,योगीनी थेटे,ज्योती तायडे,उषा शाहु, दर्शनी थेटे,प्रेमा साळी,प्रतिभा केळकर  ,पूर्णा डिंगणे,प्रतिक्षा खंडागळे आगंणवाडी
मदतनीस  साधना बडगुजर, मनिषा मटकर,शितल सकपाळ,हेमलता कारंडे, पुनम  पाटील,निर्मला पाटील  यांनी पटवून दिले.

Post a Comment

0 Comments