भिवंडीत काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्या हस्ते उदघाट्न..


भिवंडी दि 1 (आकाश गायकवाड  ) शहरातील गोपाल नगर इथं  ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस व भिवंडी पुर्व विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे डँशिंग जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वतीने माजी खासदार सुरेश टावरे यांच्या शुभहस्ते पार पडले.


          कार्यालयाच्या माध्यमातुन भिवंडी शहरातील विविध समस्यां सोडवण्यासाठी तसेच आगामी येणा-या महानगरपालिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


          यावेळी माजी आमदार शहर अध्यक्ष  रशीद ताहीर मोमीन, महिला सचिव रेहाना अंसारी,नगरसेवक जुबेर अन्सारी,काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष निलेश भोईर,काँग्रेसचे ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड,रवि परटोले,कार्यकारिणी सदस्य  मुफ्फशील पटेल  समवेत शहरातील आजी माजी अनेक नगरसेवक व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.


         यावेळी यां काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयातून सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात येणार असून काँग्रेसचा नेहमी गोरगरिबांच्या साठी पुढे राहील त्याच प्रमाणे नागरिकांच्या आवश्यक असलेल्या पाणी, कचरा, रस्ता यां महत्वाच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आंदोलनाचा देखील पवित्रा घेण्यात येणार असल्याचे अश्वासन काँग्रेसचे ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड यांनी दिले आहे..

Post a Comment

0 Comments