भाजप उमेदवार हा तुमचा भाऊ.. त्याला मतदान करा... महिला दिनी भाजपचे भावनिक आवाहन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) निवडणुका जवळ आल्या कि विकास कामे, विरोधकांवर आरोप, नागरिकांच्या समस्या यावर राजकीय पक्ष भाषण करत मतदान करण्याची आवाहन करतात. मात्र भाजपा उमेदवार हा आपला भाऊ आहे.. त्यांना भाऊबीज म्हणून मतदान करा असे भावनिक आवाहन भाजपने महिला दिनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात केले.

 

      जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा  (दत्तनगर-आयरे गाव- संगीतावाडी – रघुवीरनगर) च्या वतीने डोंबिवली पुर्वेकडील आयरे रोड संत ज्ञानेश्वर उद्यान येथे `होम मिनिस्टर खेळ वहिनींचा –मान पैठणीचा` कार्यक्रम पार पडला. डोंबिवली पूर्व मंडळ सचिव मनोज पाटील, उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांची गर्दी झाली होती.


      अर्चना पाटील, पौर्णिमा पाटील, संगीता भावसार, आरती आंबेकर, हिरल शहा, अस्मिता संचानिया, संगीता पेटकर, गीता करमेकर, उर्मिला खोना, सोनी गुप्ता, रंजना गुप्ता यांचे सहकार्य लाभले. मनोज पाटील, रविसिंग ठाकूर, माजी नगरसेवक मंदार टावरे,उमेश साळवी,मितेश पेणकर, मनोज पाटील, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

 

       यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सुरुवातील उपस्थिती महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  भाजपातील प्रत्येक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. 


       तर स्त्रियांच्या हक्कांसाठी भाजपने अनेक वेळेला आवाज उठविला आहे.कांबळे यांनी भाषणात उपस्थित महिलांना आवाहन करत भाजपचा प्रत्येक उमेदवार भावासारखा असून भाऊबीज म्हणून त्याला मतदान करा असे सांगितले.त्यानंतर कार्यक्रमातील संगीत खुर्ची स्पर्धेत विजेत्या चार महिलांना उपस्थित महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments