मा महापौर नरेश म्हस्के यांनी दिव्यांग कला केंद्रात साजरा केला विशेष मुलांसोबत विशेष जन्म दिवस

 


ठाणे, प्रतिनिधी : आज दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांच्या संकल्पनेतून विशेष मुलांनी नरेश म्हस्के यांच्या जन्मदिनी त्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले.दिव्यांग मुलींनी दिव्यांनी आरती ओवाळून औक्षण करीत मा महापौरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.


           तसेच सर्व दिव्यांग मुलांनी मिळून अतिशय आकर्षक असे मोठे ग्रीटिंग कार्ड बनवून भेट दिले. नरेश काकांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिलेला केक कापून धम्माल केली. तसेच म्हस्केंच्या तर्फे दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
      त्याचप्रमाणे संगीत कट्ट्याच्या नौपाडा विभागातील ज्येष्ठ गायकांनी सुरेल गायनाचा कार्यक्रम सादर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले. पन्नास ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, तसेच पन्नास जणांना ई श्रम कार्ड, युनिव्हर्सल पास मोफत वाटप करण्यात आले .


           दरवर्षी या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करतो.निस्वार्थीपणे या मुलांच्या जीवनात आनंद देण्याचे काम किरण नाकती व त्याचे कुटुंब करत, खासकरून त्यांचे मी आभार मानतो. दिव्यांग मुलांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.आजच्या माझ्या वाढदिवसाचा सर्वोच्च आनंद मला या दिव्यांग कला केंद्रात मिळाला.असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments