पहारे गावात वन विभागाच्या वतीने वृक्ष दिंडी सोहळा व जनजागृती सभा


कल्याण : जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र पडघा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती पहारे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी पहारे गावात गावदेवी मंदिरात वृक्ष दिंडी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.


       यावेळी वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पालघर संजय धारावणे यांच्या हस्ते वट वृक्षाचे रोपटे ठेवून तसेच गावातील महिलांच्याहस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर गावदेवी मंदिरापासून पहारे गावातील तरुणांनीमहिलांनीलहान बालकांनीतसेच जेष्ठ नागरिकांनी मोठया प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील जेष्ठांनी नाचून भजने गाऊन कार्यक्रमात उत्साह आणला.  हभप महेंद्र महाराज आणि शांताराम भोईर यांनी भजने गायली. गावामध्ये चौफेर वृक्ष दिंडी फिरविण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी पालखी पुजन केले.  त्यानंतर गावदेवी मंदिरात सभा घेण्यात आली.


 या कार्यक्रमात सूत्र संचालन वनपाल किरवली साहेबराव खरे यांनी केले . या कार्यक्रमात सेवानिवृत्त वनाधिकारीचंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जनजागृती केली. तसेच प्रमुख पाहुणे वनक्षेत्रपाल धारावणे वनरक्षक व पदो. वनपाल संघटनेचे ठाणे वृत्तीय अध्यक्ष अर्जुन निचिते, वनरक्षक व वनपाल संघटना ठाणे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनीही भाषण केले. संघटनेचे प्रतिनिधी महेंद्र साबळेवनपाल विठ्ठल दरेकर हे ही उपस्थित होते.


 स्थानिक जेएफएम अध्यक्ष नीलम भोईर, पोलीस पाटील भरत भोईरतंटा मुक्ती गाव समितीचे अध्यक्ष नामदेव पाटीलवनसंरक्षण समिती अध्यक्ष नितिन पाटीलस्वच्छता निरीक्षक अधिकारी दीपक भोईरग्रामस्थ अनिकेत पाटील, मंगेश पाटील, यांनी वृक्ष दिंडीत जनजागृती केली. तसेच इतर तरुण वर्ग आणि दिलीप माळी उल्हासनगर यांनी मोलाचे सहकार्य केले,  दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वन विभागाला सदैव सहकार्य करणारे व वन वणवा विझविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना प्रशस्तीपत्र देण्यात येऊन त्यांचा सत्कार आला.

Post a Comment

0 Comments