आधारवाडी चौकातील सिग्नल व्यवस्था तातडीने दुरुस्त करा - माजी आमदार नरेंद्र पवार

■आधारवाडी चौकात भेट देऊन नरेंद्र पवार यांनी केली सिग्नल व रस्त्याची पाहणी...


कल्याण : कल्याण पश्चिम मधील आधारवाडी चौक येथील नवीन कार्यरत झालेल्या सिग्नल यंत्रणेमध्ये त्रुटी असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. चौकातील सिग्नलच्या खांबापासून सुरक्षित असलेली स्टॉप लाईन नागरिकांना दिसत नाही, त्या स्टॉपलाईनवर ऑइलपेंटचे पट्टे ओढणे गरजेचेपादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग अर्धवट आहे अशा आबेक समस्या असल्याने त्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्याकडे केली.


कल्याणमध्ये सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली असली तरीही सकाळी शहरात प्रवेश करणाऱ्या व सायंकाळी बाहेर जाणाऱ्या वाहतुकीसाठी हिरवा सिग्नल जास्त वेळेसाठी असावापादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी केवळ १५ सेकंद वेळ आहे तो वाढवण्याची आवश्यकता आहे असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले. सुज्ञ नागरिक अशोक शेलार आणि सुधीर गायकर यांनी या संदर्भात नरेंद्र पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा पाहणी दौरा आयोजित केला होता.


नागरिकांना वाहतूक करताना सोयीस्कर व्हावे यासाठी तातडीने या त्रुटी दुरुस्त करण्याची गरज आहे. या त्रुटी सोडविल्या तर अपघात कमी होणार असून नागरिकाला वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागणार नसल्याचे नरेंद्र पवार म्हणाले. यावेळी अशोक शेलारगोपाल शेलार विवेक शेलारसुधीर गायकरतानाजी गायकरअरविंद शेलार आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments