शिवजयंती निमित्ताने शिवसेना सांस्कृतिक विभागातर्फे ' शिवबा माझा 'चित्रकला स्पर्धा


ठाणे | शिवजयंती निमित्त किरण नाकतींनी ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे , खासदार श्री राजनजी विचारे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख नरेशजी म्हस्के यांच्या सहकार्याने 'शिवबा माझा' अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यातील चित्रकला स्पर्धा 20 मार्च रोजी आयोजित करण्यात आली.  इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी आणि अकरावी व पुढील अशा तीन वयोगटा मध्ये चित्रकला स्पर्धा विभागली गेली.

        बाल शिवाजी, निसर्ग चित्र, सण-उत्सव महाराष्ट्राचे, आवडता किल्ला ,आवडता खेळ, धर्मवीर आनंद दिघे आणि हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे ह्या स्पर्धेचे विषय होते .ठाणे शहरातील विविध विभागातील तब्बल १०० मुलांनी व पालकांनी सहकार्य करून चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. चित्र काढताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि  समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. प्रत्येक मुलाने स्पर्धेचा आनंद लुटला. 

        शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, विलास जोशी, भास्कर पाटील, राजु गजमल, प्रकाश पायरे,प्रितम राजपूत,भूषण शिंदे,जितू वर्मा, हर्षल आठवले,विजय डावरे,राजन मयेकर व इतर समस्त सांस्कृतीक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित दिली.  चित्रकला स्पर्धेचे निकाल हे प्रथम, द्वितीय ,तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार गटात नेमले गेले , विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र व रोख रक्कम स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले.


         पहिली ते चौथी (गट१) वयोगटांमध्ये प्रथम पारितोषिक राज संतोष एकावडे मिळाले तसेच द्वितीय  पारितोषिक यश घनश्याम चौधरी, तृतीय पारितोषिक सार्थक रहाटे आणि  उत्तेजनार्थ पारितोषिक जानवी विनोद दुधाने ह्यांना मिळाले. पाचवी ते दहावी(गट२) वयोगटामध्ये प्रथम पारितोषिक समृद्धी शिखरे मिळाले तर द्वितीय पारितोषिक भूमी अहेर, तृतीय पारितोषिक प्रणाली मोहिते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक आदेश परब हयांना मिळाले. 


        अकरावी व पुढील (गट ३) वयोगटांमध्ये प्रथम पारितोषिक आयुष चौधरी तिला मिळाले तर द्वितीय पारितोषिक अर्चना सोळंकी तृतीय पारितोषिक तेजस पकाये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्रसन्ना खोत यांना मिळाले. तसेच मुक्त वयोगटामध्ये भूषण सहदेव तांबे यांना प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर र.म शेजवलकर ह्यांनी केले. बक्षीस वितरण समारंभ र म शेजवलकर आणि अभिनेते निरंजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. 


       चित्रकला स्पर्धेत मुलांनी सहभाग देऊन नेमून दिलेल्या विषयांवर सुंदर चित्र काढले. त्यांच्यातील ती उत्सुकता पाहून आपला महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी आपली ही पिढी महाराष्ट्राचे संस्कार जपते याचा खूप आनंद वाटतो असे किरण नाकती हयांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments