सुतिकागृहाच्या खाजगीकरणास विरोध... वंचित बहुजन आघाडीचे लाक्षणिक उपोषण


डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय हे सर्व उपचारांसाठी कमी पडत असून प्रशासन गरीब रुग्णांसाठी सर्वसुविधायुक्त असे शासकीय रुग्णालय देऊ शकले नाही.गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या डोंबिवलीत सुतिकागृहाची इमारत धोकादायक झाल्याने बंद करण्यात आले.          पालिका प्रशासने डोंबिवलीत ५० बेडचे सुतिका गृह पी पी पी तत्वावर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी येथील धोकादायक इमारतीच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. सूतिका प्रसूती गृहाचे नूतनिकरण करा व त्यास राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 


       गरिबांना उपचार मिळावे यासाठी शासकीय रुग्णालयात सर्व सुविधा पुरविणे आवश्यक असते.परंतु स्मार्ट सिटी असलेल्या डोंबिवली शहरात पालिकेचे रुग्णालय गरिबांसाठी नावापुरतेच राहिले आहे. शास्त्रीनगर रुग्णालय हे त्याचे उदाहरण असून गरोदर महिलांसाठी सूतिकागृह हि पालिकेची इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली.सात वर्ष उलटली तर सूतिकागृहाची इमारत पुन्हा उभी करण्यास शिवसेना-भाजप यांच्यात श्रेयवाद सुरु होता.


  

         नुकताच पालिकेच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीत ५० बेडचे सुतिका गृह पी पी पी तत्वावर उभारण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.यावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.उपोषणात महासचिव मिलिंद साळवे, डोंबिवली पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोकेहरीश गुप्ता समन्व्यक अंबरनाथ,राजू काकडे उपाध्यक्ष, सचिव बाजीराव माने, ठा.जि. महासचिव महिला रेखा कुरवारे, अध्यक्ष डोंबिवली महिला अध्यक्ष अस्मिता सरवदे , महासचिव वैषाली कांबळे, संघटक अर्जुन केदार, उपाध्यक्ष आशा ठोके, कोषाध्यक्ष तेजस कांबळेनंदू पाईकराव सचिववैजनाथ कांबळेअशोक गायकवाडसंघटकदीपक भालेरावसुनील ठोके,विजय इंगोले,निलेश कांबळेहे उपस्थित होते.

  

         यावेळी डोंबिवली पूर्व अध्यक्ष ठोके म्हणाले, आमचे हे उपोषण हे स्त्ताधारी आणि प्रशासन यांच्या विरोधात आहे.मुंबई आणि ठाणे येथील शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा कल्याण –डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयात का मिळत नाही याचे उत्तर पालिका आयुक्तांनी जनतेला दिले पाहिजे. महासचिव साळवी म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने याआधी पाच वेळा आंदोलन केले होते. वास्तविक शिवसेना आणि भाजपने जनतेची दिशाभूल करत असून त्यांनी कोणताही निधी दिला नाही.


    तर रेखा कुरवारे म्हणाल्या, सूतिकागृहाचे  खाजगीकरणास आमचा विरोध आहे. दरवेळी रुग्णांना पुढील उपचारासाठ मुंबईतील सायन किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.पालिकेचे येथील रुग्णालय  गरिबांसाठी नाही का असा प्रश्नही उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments