कल्याणात आम आदमी पार्टीत उच्च शिक्षित चेहरा जतीन चव्हाण यांची क प्रभाग अध्यक्ष पदी निवड


कल्याण : दिल्लीत सत्तेच्या माध्यमातून काम करताना आणि नागरिकांची पसंती मिळवताना पंजाब राज्य देखील भरगोस मतांनी काबीज करून आम आदमी पक्षाने देशात छाप पडली आहे. हे संपादित केलेले यश पाहता महाराष्ट्रातील तरुणांचा या पक्षाकडे कल वाढला असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा उच्च शिक्षित जतीन विनोद चव्हाण यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आता त्याच्याकडे पालिकेच्या 'प्रभाग क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. 


निवडणुकीचा काळ जवळ आल्याने सर्व पक्ष मोर्चे बांधणीसाठी तयार होतात. बैठका चर्चासत्राला सुरवात होते. नुकतीच कल्याणात आम आदमी पार्टीची बैठक पार पडली. दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता स्थापनेसाठी यश आले आहे. आम आदमी पार्टीची काम करण्याची विचारधारणा पुढे आणण्यासाठी तसेच नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यासाठी पार्टी हि कामाला लागली आहे. तरुण तडफदारउच्च शिक्षित असलेले युपीएससीचा अभ्यास करणारे जतीन चव्हाण यांची आम आदमी पार्टीच्या क प्रभागाच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. 


कल्याण डोंबिवली शहरात नागरिकांच्या मुलभूत समस्याचा प्रश्न पदोपदी जाणवत आहे. त्याचबरोबर नागरिकांना चांगली आरोग्यसेवा नाही. शिक्षणासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात फक्त ६ टक्केच तरतूद आकरण्यात आली आहे. तसेच सफाई कामगारांच्या समस्यासह इतरही सस्यांकडे पक्षातर्फे लक्ष देणार असल्याचे देखील जतीन यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments