भ्रष्टाचारामुळे रखडला कल्याण मधील कोकण गृहनिर्माण वसाहतीचा पुर्नविकास प्रकल्प राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांचा आरोप

■कित्येक वर्षे उलटून देखील सदनिका न मिळाल्याने रहिवासी हवालदिल , विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली कोकण वसाहतीतील नागरिकांची दखल..


कल्याण, कुणाल म्हात्रे  : भ्रष्टाचारामुळे कल्याण मधील कोकण गृहनिर्माण वसाहतीचा पुर्नविकास प्रकल्प रखडला असल्याचा आरोप  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी केला असून कित्येक वर्षे उलटून देखील सदनिका न मिळाल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. तर या प्रकरणाची दखल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि कोकण वसाहतीतील नागरिकांची नुकतीच बैठक घेत याप्रकरणी तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या आहेत.


कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील बिर्ला कॉलेज येथील कोकण गृहनिर्माण मंडळ अंतर्गत एमआयजी  एलआयजी एचआयजी त्यांच्या रखडलेल्या घराच्या संदर्भात काही नागरिकांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवन येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याबाबत २७ जानेवारी रोजी पहिली बैठक घेण्यात आली होती त्यानंतर २४ फेब्रुवारी  रोजी दुसरी बैठक घेण्यात आली.


या बैठकीला कोकण वसाहत येथील बरेच सदस्य हजर होते. कोकण गृहनिर्माण मंडळाचे अधिकारीकल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारीविधानभवनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांचे सर्व प्रश्न समजून त्यावर योग्य दिशा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आली. यावेळी किरण शिखरे यांच्या समवेत आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे विशेष निमंत्रित सदस्य नगरसेवक संजय पाटीलनाशिक ग्रामीण विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करेनितीन पाटीलसोमनाथ सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.


       २०१४ साली कोकण गृहनिर्माण मंडळ अंतर्गत बिर्ला महाविद्यालयानजीक असलेल्या एमआयजी १, एलआयजी १ या वसाहतीच्या पुनर्विकासाला सुरवात करण्यात आली. मात्र कित्येक वर्षे उलटून देखील विकासकाने हा प्रकल्प पूर्ण न करत सदनिका न दिल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. विकासकाने येथील रहिवाशांना दिले जाणारे भाडे देखील बंद केले असून आधीच कोरोना महामारीने आर्थिक संकटात सापडलेले नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या नागरिकांनी याबाबत किरण शिखरे यांची भेट घेत आपली व्यथा मांडलीं. यावर शिखरे यांनी याबाबत पाठपुरावा करत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे बैठक लावत या रहिवाशांचा प्रश्न लावून धरला आहे.


         विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोकण गृहनिर्माण मंडळाचे अधिकारीकल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारीविधानभवनातील अधिकारी यांना या बैठकीत याप्रकरणी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments