बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने हॉस्पीटलचा रुग्णाला सोडण्यास नकार सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या


कल्याण : बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने हॉस्पीटलने रुग्णाला सोडण्यास नकार दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या  दालनात ठिय्या मांडला. शासकीय हॉस्पीटलमधील डॉक्टरने एका महिलेला उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये पाठविले. मात्र त्या खाजगी हॉस्पीटलने अव्वाच्या सव्वा बील लावल्याने रुग्णाचे नातेवाईक हैराण झाले.


              १२ दिवसापासून हॉस्पीटल रुग्णाला सोडत नाही. नातेवाईकांकडे बिल भरण्यासाठी पैसे नाही. ही परिस्थिती ऐकताच सामाजिक कार्यकर्त्यांनी  थेट महापालिका मुख्यालय गाठले. आरोग्य अधिका:यांच्या दालनात ठिय्या मांडला. अखेर आरोग्य अधिका:यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉस्पीटलला रुग्णास सोडण्यास सांगितले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


            कल्याणमध्ये राहणारे अजय यादव यांची वयोवृद्ध आई शिवमूर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने अजय याने आईला कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. त्याठिकाणच्या डॉक्टरांनी या ठिकाणी उपचार होऊ शकत नाही. मी सुचविलेल्या हॉस्पीटलमध्ये जा. या आजारावर त्याठिकाणी उपचार होईल. 


          जेव्हा अजयने विचारले की, उपचाराचा खर्च किती येईल. तेव्हा डॉक्टरने ३५ हजार रुपये लागतील. उपचारानंतर हॉस्पीटलने बिल पाठविले. ते पाहून अजय यादव हे हैराण झाले. खाजगी रुग्णालयने अजय यांना एक लाख २० हजार रुपयांचे बिल पाठविले. इतके पैसे अजय यांच्याकडे नसल्याने हॉस्पीटल त्यांच्या आईला डिसचार्ज देत नव्हता.

 
          याविषयीची माहिती समाजिक कार्यकर्ते शैलेश तिवारी, राहूल काटकर आणि अन्य जणांना मिळताच त्यांनी अजयला सोबत घेऊन थेट महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांचे दालन गाठले. त्यांच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलन सुरु केले. संबंधित डॉक्टर आणि हॉस्पीटलच्या विरोधात कारवाईची मागणी केली. 


        या बाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्वीनी पाटील यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल. सध्या रुग्णाला मुंबईला हलविण्यात येईल. ज्या डॉक्टरवर आरोप आहे. ते आमच्या पॅनलवरील डॉक्टर आहेत. ते शासकीय डॉक्टर नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments