प्राजक्ता मच्छिंद्र कांबळे यांचे निधन

 


कल्याण : समर्थ ऍडव्हर्टायझर्सचे संचालक मच्छिंद्र कांबळे यांच्या पत्नी प्राजक्ता कांबळे यांचे दिनांक १७ मार्च २०२२ रोजी दुःखद निधन झाले आहे. मच्छिंद्र कांबळे हे गेल्या वीस वर्षापासून कल्याणमध्ये वृत्तपत्र जाहिरातीचे काम करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कांबळे यांनी जाहिरात क्षेत्रात मोठे यश संपादन केले होते त्यांच्या यशात त्यांची पत्नी प्राजक्ता यांचा मोठा वाटा होता. 


          प्राजक्ता कांबळे ह्या साप्ताहिक कल्याण नागरिकचे मुद्रक आणि प्रकाशकही होते. प्राजक्ता या सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या हिरीरीने भाग घेत असत. प्राजक्ता यांच्या जाण्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात पती मच्छिंद्र कांबळे, आणि दोन मुले प्रथमेश, राज असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments