रस्ता दुरुस्ती,गटर्स व पाईपलाईन कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे दिले निर्देश


ठाणे  : ठाणे महापालिकेच्यावतीने वागळे इस्टेट, किसननगर परिसरातील रस्ता दुरुस्ती, गटर्स, रोड दुभाजक तसेच रोड नंबर २२ येथील पाईपलाईन कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देतानाच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ईशारा ही त्यांनी यावेळी दिला.


        यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त आयुक्त मारुती खोडके, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.  


        शहरातील मॉडेला नाका ते रोड नं.१६ सर्कल, रोड नं.२२ ते दालमिल रोड, आरटीआय रोड येथील रस्त्यांची पाहणी करून कांक्रीटीकरणाची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. तसेच यामध्ये  कल्वर्ट,आरसीसी गटर्स, वृक्ष लागवड व पदपथाची उर्वरित कामे देखील तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


     दरम्यान शहरातील रोड नंबर २२ येथील पाईपलाईन कामाची ही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून संबंधित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments