कल्याणातील धोकादायक इमारती चा सज्जा कोसळल्याने एक महिला जखमी

      


कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालया पासून हक्केच्या अंतरावर असणाऱ्या धोकादायक इमारती चा सज्जाचा काही भाग कोसळल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी कल्याणात घडल्याने धोकादायक इमारतीचा निष्कसनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.  


       कल्याण पश्चिमेतील कुभांरवाडा परिसरातील टिळक चौक रस्त्यालगत असणारी सुमारे चाळीस वर्षीय जुनी प्रशासनाने धोकादायक घोषित केलेल्या रामजी जिवा मेशन् इमारतीच्या   मजल्यावरील सज्ज्याचा काही भाग कोसळल्याने तिकडून बँकेत जात असलेल्या सुमित्रा प्रजाती व त्यांच्या सहकारी महिला थोडक्यात बचावल्या यामध्ये सुमित्रा यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३०वा. घडली. सुमित्रा यांना खाजगी दवाखान्यात नेले असता डोक्याला मलम पट्टी करून औषधा उपाचराअंती त्यांना घरी सोडले असल्याचे समजते.           

     
           भर रस्त्या लगत असणाऱ्या या धोकादायक इमारतीचा सज्जेचा भाग दुसऱ्यादा कोसळला असून  ती धोकादायक इमारत निष्कसित होणे अत्यंत गरजेचे आहे. संभाव्य जिवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.            


             "क" प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्याशी संदर्भीत घटनेबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संदर्भीत इमारत सुमारे ४०वर्षे जुनी असुन धोकादायक इमारत म्हणून संदर्भीत इमारत घोषित करण्यात आली असून या धोकादायक इमारतीचे पाडकाम करण्यात  कोर्टाची स्टे आँर्डर असल्याने  काम  प्रलंबित आहे. 

Post a Comment

0 Comments