आम्ही चुकलो तुम्ही चुकू नका.. नो इंट्रीत वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांकडून प्रबोधन


डोंबिवली ( शंकर जाधव ) शॉटकट हा जीवानास धोकादायक आहे.. आम्ही चुकलो तुम्ही चुकू नका असा संदेश देत नो इंट्रीत वाहन नेणाऱ्या वाहनचालकांकडून प्रबोधन करण्यात आले. डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेसमोर नो इंट्रीत वाहनचालक बिनदास्तपणे वाहने चालवतात.वाहतूक पोलीस सदर ठिकाणी कारवाई करतात. वाहतूक पोलिसांनी नो इंट्रीत वाहन नेणाऱ्या वाहनचालकांकडून दुसऱ्या वाहनचालकांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी मार्गाने समजावले. 


      डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेसमोर नो इंट्रीत वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना त्यांच्याकडून इतर वाहनचालकांचे प्रबोधन केले.नो इंट्रीत वाहन चालविणाऱ्या एका डॉक्टरने घाई असल्याने चूक झाल्याचे मान्य केले. तर दोन महाविद्यालयीन तरुणांनी पुन्हा अशी चूक होणार नाही असे संगितले.सुशिक्षितांकडूनही वाहनचालविताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले जात नसल्याचे यावरुन दिसून आले.  


Post a Comment

0 Comments