ठाणे दि. ३० : नात्यांमधली गुंतागुंत, शहरातली घुसमट आणि एकंदर अवती-भवती घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांना कवितेच्या रुपातून टाहो फोडणारा कवी जितेंद्र लाड यांच्या 'माझ्या जगण्याचं बळ' या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. २ एप्रिल रोजी प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते आणि ज्ञानविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड पी सी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपरखैराणे येथील गणेश नाईक सभागृह, येथे सायंकाळी ५ वाजता ज्ञानविकास संस्थेच्या सहकार्याने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कवी संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रा. सुरेश शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे. या कार्यक्रमा दरम्यान कवी जिंतेंद्र लाड यांच्या निवडक कवितांचे वाचन, कवी विशाल उशिरे, कवी उमेश जाधव, कवयित्री अनघा जावकर, कवी वैभव वऱ्हाडी करणार आहेत. या कार्यक्रमाला कवी साहेबराव ठाणगे, कवी सतिश सोळांकुरकर, कवयित्री योगिनी राऊळ, कवी दुर्गेश सोनार, कवयित्री वृषाली विनायक, आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
0 Comments