कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसवू – संजय मोरे कल्याण पूर्वेत भाजपाचा विजयोत्सव


कल्याण   : आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवू असा विश्वास भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे. चार राज्यात भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल कल्याण पूर्वेत भाजपाच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.


        नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वाखाली पूर्ण भारत देश चालत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सुद्धा भाजपाचा विजय झाला आहे. नागरिकांनी मोदींवर विश्वास ठेवून भाजपा हा एक नंबर पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असून हर हर मोदी घर घर मोदी या घोषणेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर बसवू असा विश्वास संजय मोरे यांनी व्यक्त केला.


           कल्याण पूर्वेत संजय मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी ढोलच्या तालावर नाचत, एकमेकांना लाडू भरवत हा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी संजय मोरे यांच्यासह सुनिता गरुड, प्रिया जाधव, दत्तात्रय गरुड, पांडुरंग भोसले, नितेश म्हात्रे, सदानंद शिंदे आदींसह जेष्ठ नागरिक, महिलाआणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

Post a Comment

0 Comments