रामबागेत गटाराचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिक त्रस्त

  

■साफसफाई करून गटाराचे नुतनीकरण करण्याची मागणी..


कल्याण : रामबाग मेन रोड नवीन रस्ता बनविला त्यावेळेस काही तांत्रिक चुकांमुळे तसेच अवती भवती असलेला फुटपाथ त त्याखालील गटारींची अडचण लक्षात न घेतल्यामुळे रस्ता खूप खोल तसेच वा गटार फुटपाथ खूप उंच झाल्याने गटार तुंडुंब भरून लिकेज होऊन रामबाग मेन रोडवर पाणी साठते. 


          याबाबत कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जयदीप सानप यांनी फेब्रुवारी महिन्यात पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील  तब्बल दीड महिना उलटून देखील पालिकेने याकडे लक्ष न दिल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत रामबाग मेन रोडवर स्विमिंगपूल आणि सर्व्हिससेंटर चालू केले असून नागरिकांना मोफत अंघोळ किवा आपले वाहन धुवायचे असल्यास या ठिकाणी जावे असे उपहासात्मक आवाहन करत महापालिकेला टोला लगावला आहे.


नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सानप यांनी अनेक दिवसापासून पाठपुरावा करीत असून लेखी तक्रारी देखिल दिल्या आहेत. तरी फक्त उडवा उडविचे उत्तरे मिळत आहेत. आयुक्त सांगतात काम प्रोसेस आहे. प्रभाग अधिकारी आणि इतर सांगतात २ कोटींचे प्रपोजल आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तरुण जुनेजा यांना विचारले असता असे कोणतेहि प्रपोजल पेंडींग नाही


एसआयला सांगितले तर ते म्हणतात बांधकाम विभागाचे काम आहे. त्यामूळे ही समस्या सुटणार की नाही असा प्रश्न येथील  नागरिकांना पडला आहे. या रस्त्याच्या आजूबाजूच्या प्रभागात १९९५  पासुन शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सन २००० ते २००५ काँग्रेस तर २०१५ भाजपा म्हणजेच एकूण युतीची सत्ता धारी नगरसेवक महापौर त्यांचेच असून देखील  गेल्या २ वर्षापासून ही समस्या सुटत नाही.


सद्यस्थित आजही त्या रोडवर गटारीचे पाणी भरून वाहत आहे येणारे जाणारे त्या घाणीच्या पाण्यातून जावे लागते. वाहन रोडवरून गेल्यास पणी अंगावर उडतेखूप दुर्गंधी पसरते. आयुक्तांपासून ते ज्युनियर इंजिनियर पर्यंत सर्व अधिकारी याचा सर्व्हे करून गेले आहेत. परंतु घोंगडे कुठे अडकले असा सवाल नागरिकांना पडला आहे. 


त्यामुळे रामबाग मेन रोड ममता मेडिकल येथील गटार तात्पुरते साफ करून लवकरात लवकर नुतनीकरण करण्याची मागणी जयदीप सानप यांनी नागरिकांच्या वतीने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments