आता बस्स... डोंबिवलीत पोलिस ठाण्यावर महामोर्चा काढून मी व कार्यकर्ते पोलिसांना घेराव घालू. - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस


डोंबिवली ( शंकर जाधव ) मनोज कटके या भाजपा कार्यकर्त्यावर  झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे हे योग्य नाही. त्यामुळे अधिवेशन संपताच डोंबिवलीतील  पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढण्यात येईल त्याला मी स्वतः नेतृत्व करील असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत केले आले. 

  
        विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जखमी मनोन कटके यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कटके यांच्यावरील जखमा पाहून तो जीवघेणा असाच होता .कटके हे हल्ल्यात वाचले असले तरी अशा घटना यापुढे होता कामा नये याची पोलिसांनी नोंद घ्यावी म्हणून मी इथे आलो आहे. या हल्ल्यामागे सूत्रधार जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचावे अन्यथा असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत पोलिस यंत्रणा पारदर्शी पद्धतीने काम करावी हे कळत नसल्याने ते कळत नसल्याने मला इथे यावे लागले म्हणूनच पोलिस यंत्रणा काम करत नसेल तर मला मोर्चा काढावा लागेल.


           राजकीय हल्ला हा कोणत्या पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे यापेक्षाही तो जीवघेणा झाला हे योग्य नाही म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागे सक्षम उभे आहोत याची नोंद सर्वांनी घ्यावी. दरम्यान पत्रकारांवरील हल्ले घेतले जाणार नाहीत. त्यावर सभागृहात हा विषय मांडणार असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यासाठी त्यांनी यासाठी त्यांनी सर्व घटनेची माहिती दिली. श्रीराम कांदू यांनी  फडणवीस   भेट घेतली.  


          यावेळी आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड यांसह भाजपाच्या माजी नगरसेवकांनी पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत शिवसेनेवर थेट आरोप करत प्रारूप प्रभाग रचना आधीच ठरलेली आहे याची माहिती फडणवीस यांना दिली. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकांना त्रास देण्याचा प्रकार शिवसेनेने सुरू केला आहे याबद्दल थोडक्यात माहिती त्यांना देण्यात आली यावर विरोधी पक्षनेते यांनी यांनी पोलिसांच्या दबावाला न जुमानता पोलिसांना घेराव घालू असे उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलताना फडणीस यांनी दिले.

Post a Comment

0 Comments