युक्रेन मधून चार वर्षानंतर मायदेशी परतलेल्या भिवंडीतील मुस्कान मुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फुलली मुस्कान...


भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) युक्रेन रशिया युद्धात अनेक जण होरपळत असताना भारतातील वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून युक्रेन येथे गेलेले हजारो विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडलेले असताना भारत सरकार ने मिशन गंगा अभियान राबवून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यास सुरवात केल्या नंतर अनेक पालकांची चिंता वाढली होती.अनेकांनी आपली मुलं घरी कधी येतात या कडे डोळे लावून बसले होते .


         असे असताना तब्बल आठ दिवसांच्या खडतर प्रवासा नंतर पडघा भिवंडी येथील मुस्कान फिरोज शेख अखेर घरी सुखरूप आली आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर मुस्कान पसरली  2018 पासून युक्रेन मधील कीव शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेली मुस्कान थेट चार वर्षाने घरी परतली.युक्रेन मध्ये खास करून कीव शहरावर सततच्या हल्ल्याने हादरले असताना त्याच्या बातम्या कुटुंबियांची धास्ती वाढवत होती .


         अशा परिस्थितीत न्यूक्लिअर हल्ला होण्याचे संकेत मिळाल्या नंतर कीव मधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना शहर सोडण्याची सूचना दिली व मग 28 फेब्रुवारी पासून सुरू झाला मुस्कानचा भेदरलेला प्रवास .कीव मध्ये तब्बल चार वर्षे राहिल्याने त्या शहरा सोबत भावनिक नाते जोडले गेले होते .अशा परिस्थितीत शहर सोडताना सुंदर इमारतींचे भग्नावशेष मन सुन्न करायला लावत होत्या .तर रस्त्यावर ठिकठिकाणी मृत सैनिकांच्या शरीराचे अवशेष आढळून आले .ते बघताच मेट्रो स्थानक गाठले .त्या परिस्थितीत स्थानिक लष्कराने बरीच मदत करत आम्हाला सुरक्षित मेट्रो वर पोहचविले.


          तेथून 12 तासांच्या प्रवासा नंतर लविव व पुढे मजल दरमजल  करीत युजोग्रोथ, चॉप, स्लोकियोवा, तेथून हंगरी च्या सीमेवर येऊन पोहचलो.मग  त्या ठिकाणी चार दिवस अडकून पडल्या नंतर त्यांचा नंबर विमान प्रवासा साठी लागला .तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून चौथ्या वर्षात शिक्षण घेत असताना युद्धा मुळे मुस्कान सह हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेश गाठावे लागले.त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणाची चिंता सतावीत आहे.

Post a Comment

0 Comments