डोंबिवलीत हभप संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक होणार


डोंबिवली ( शंकर जाधव ) गेली अनेक दिवस वारकरी,किर्तनकार,प्रवचनकार, तसेच विविध क्षेत्रातील  सामाजिक कार्यकर्ते यांचा डोंबिवली सांस्कृतिक नगरीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक उभारावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. या समाजकार्यात नक्कीच यश मिळेल अशी आशा बाळगत संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक समितीची स्मारक  अध्यात्मपिठ उभारणीबाबत  मानपाडा येथील मानपाडेश्वर महादेव मंदिर येथे सभा घेतली.         सभेत हभप संत सावळाराम महाराज यांचे नातू हभप चेतन महाराज म्हात्रे यांच्यासह अनेक कीर्तनकार, वारकरी,आगरी समाजातील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.महाराजांच्या स्मारकासाठी सुमारे १० ते १५ एकर जागेसाठी पालिका प्रशासनाकडे भूखंडाची मागणी करणार असून यात अध्यात्मिक पिठाच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनावर लिखित स्वरूपात जीवनपट दाखविले जाणार आहेत.

    


    या सभेत महाराज हभप चेतन महाराज म्हात्रे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, हभप गणेश ठाकूर, हभप प्रकाश महाराज ( सोनारपाडा ), हभपजयेश महाराज आंभे, हभप विनीत महाराज ( सोनारपाडा ), हभप जनार्दन महाराज ( ईताडे ), आगरी युथ फोरमचे गुलाब वझे, दत्ता वझे,शरद पाटील, प्रभाकर चौधरी, रंगनाथ ठाकूर, गजानन मंगरुळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेत सर्व वारकरी,किर्तनकार,प्रवचनकार,,विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून महाराजांचे स्मारकअध्यात्मपिठ उभारणीसंदर्भांतील आपले विचार व संकल्पना मांडली.       आगरी युथ फोरम संचालीत हभप संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक समितीच्या सभेत वास्तुविशारद राजीव तायशेटे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन स्मारकाबाबत संकल्पनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. हभप संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नातू हभप चेतन महाराज म्हात्रे म्हणाले,  संत सावळाराम महाराज म्हात्रे  यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्मारकात वारकरी शिक्षण संस्था, सांकृतिक विद्यापीठ , संगीत विद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गायन व वादन याचे शिक्षण दिले जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे  या अध्यामिक पिठात महाराजांच्या जीवनाची माहिती देणारे लिखित जीवनपट दाखवले जाणार आहेत.          पंढरपूर, आळंदीप्रमाणे महाराजांचे स्मारक हे देशातील वारकरी, कीर्तनकार आणि भक्तांसाठी तीर्थक्षेत्र असेल असेही ते म्हणाले. गुलाब वझे म्हणाले, संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारकासाठी वास्तुविशारद राजीव तायशेटे यांनी पालिकेच्या तीन-चार राखीव भूखंडाची पाहणी केली आहे.सुमारे १० -१२ एकर जमिनीवर स्मारक होऊ शकते. भूखंड ताब्यात आल्यावर  अध्यामिक पीठ व स्मारक बनविण्यासाठी ५ ते १० कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी सर्वांनी खारीचा वाटा म्हणून मदत करावी असे आवाहन या सभेत वझे यांनी केले.   

  

    

 

  चौकट

  

          संत सावळाराम महाराजांनी वारकरी संप्रदायिक संतविचारांची कास धरुन किर्तनप्रवचनाच्या माध्यमातून समाजामधे जे वैचारीक परिवर्तन घडवून आणले त्याची फळे आजपर्यंत आपण चाखत आलेलो आहोत. महाराजांची ही वैचारीक ठेवत्यांचे लोकोद्धार कार्याची माहिती समाजाला सहज उपलब्ध व्हावीअध्यात्मपिठाच्या माध्यमातून सुसंस्कारीत पिढी घडावी या हेतूने महाराजांचे स्मारकअध्यात्मपिठ उभारणी करण्याचा समितीचा मानस आहे.महाराजांचे स्मारकअध्यात्मपिठ उभारणी सर्वांच्या विचारमंथनातून घडावे असा समितीचा प्रयत्न असल्याचे सभेत सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments