बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन


डोंबिवली ( शंकर जाधव )  केंद्र सरकारने मेक इन इंडिया उपक्रमातून बीएसएनएलला ४ जी सुविधा सुरु करण्यास परवानगी  उशिरा मिळाली.पण हि प्रणाली बीएसएनएल कडून अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात आल्याने ५ जी मध्ये देखील सहजपणे बदलता येऊ शकणार असून १५ ऑगस्ट पर्यत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याचे बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्मा यांनी डोंबिवलीत सांगितले. बुधवारी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, पालघर मधील १५ सेंटरचे उद्घाटन बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्माच्या हस्ते डोंबिवलीतून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 
 

          यावेळी अधिक माहिती देताना बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रमाकांत शर्मा म्हणाले, भारत संचार निगम या सरकारी टेलिफोन विभागाने खाजगी स्पर्धकाशी स्पर्धा करताना फोरजी फायबर सुविधा उपलब्ध करून दिली असून या द्वारे अतिशय वेगाने मिळणाऱ्या सुविधेमुळे हि सुविधा अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. आता बीएसएनएलच्या माध्यमातून आधार युनिक सुविधा सुरु करण्यात आली असून बुधवारी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, पालघर मधील १५ सेंटरचे उद्घाटन बीएसएनएलचे मुख्य जनरल मनेजर रामकांत शर्मा च्या हस्ते डोंबिवलीतून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 


          यावेळी बोलताना त्यांनी बीएसएनएलकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधाची माहिती दिली. तसेच बीएसएनएलच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आधार केंद्राचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे सांगितले. तर आणखी १५ सेटर लवकरच सुरु केली जाणार आहे. डोंबिवलीत बीएसएनएलचे ९ हजार ग्राहक असून मागील २ महिन्याच्या कालावधीत बीएसएनएलची 'फायबर टू होम' सुविधा लोकप्रिय झाली असून खाजगी कंपन्याची स्पर्धा असताना देखील ग्राहकाकडून या सुविधेला पसंती मिळत असून आतापर्यत १२०० ग्राहकांनी हि सुविधा घेतली आहे. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने या योजनेतील प्लान तयार करण्यात आल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments