कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी मौजे नांदीवली तर्फ पंचानंद, डोंबिवली पूर्व येथील युनियन बँक ते रवीकिरण सोसायटी, डीपी रोडला बाधित होणा-या, जागामालक सचिन साबळे, बांधकामधारक अविनाश जागुष्टे यांच्या तळ+७ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई सुरु केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व १ पोकलेन, ५ कॉम्प्रेसरच्या सहाय्याने करण्यात करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी बल्याणी, उंबर्णी येथील १६ जोते निष्कासनाची धडक कारवाई केली. त्याचप्रमाणे टिटवाळा येथील घर आंगण सोसायटीच्या मागील १३ जोते व गणेशवाडी येथील १० जोते याठिकाणी बांधकाम सुरू होण्यापूर्वीच निष्कासित करण्याची कारवाई देखील १ जेसीबीच्या सहाय्याने व महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी वर्ग व महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.
0 Comments