चिकणघर ते कल्याण रेल्वे स्टेशन महिलांसाठी मोफत रिक्षा प्रवास जागतिक महिला दिना निमित्त संकेत भोईर यांचा स्तुत्य उपक्रम


कल्याण : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत प्रभाग क्र १० चिकणघर गावठाण येथील शिवसैनिक संकेत भोईर यांनी महिलांसाठी चिकणघर रिक्षा स्टँड ते कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत मोफत प्रवासाचे आयोजन केले होते.

   
            ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्र १० चिकणघर गावठाण मध्ये शिवसैनिक संकेत भोईर यांनी महिलांसाठी चिकणघर रिक्षा स्टँड ते कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत मोफत प्रवासाचे आयोजन करण्यात आले. या मोफत रिक्षा या उपक्रमाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. 


        तसेच विभागातील महिला बचत गटांसाठी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम करण्यात आला. त्याचबरोबर प्रभागातील नवीन बचत गटांचे कार्यालयामार्फत मोफत रजिस्ट्रेशन करण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments