ब्रिटीश ऑटो मोबाईल ब्रँड वन मोटो इंडियाची ग्लोबल अॅश्युरसह भागीदारी

ग्राहकांना रोडसाइड अॅसिस्टंट पुरविण्यासाठी केला करार ~


मुंबई, ९ मार्च २०२२ : वन मोटो इंडिया - भारतातील मोहक आणि उच्च दर्जाच्या विद्युत वाहनां (ईव्ही)च्या पहिल्या ब्रिटीश ब्रँडने, भारतातील अग्रणी रोडसाइड अॅसिस्टंट कंपनी, ग्लोबल अॅश्युरसोबत भागीदारी जाहीर केली आहे. भागीदारीच्या व्यतिरिक्त, ग्लोबल अॅश्युर वनद्वारे मोटो इंडियाच्या ग्राहकांना इतर सहाय्य सेवांसह कोणत्याही ऑटोमोटिव्ह ब्रेकडाउनबाबत २४ x ७ सहाय्य पुरविले जाईल.


      या कार्यक्रमाअंतर्गत ग्राहक वाहनाचे टोइंग, फ्लॅट टायरची दुरुस्ती / बदली, ऑनसाइट दुरुस्ती, की लॉकआउट सर्व्हिसेस, अॅम्ब्युलन्स रेफरल, वाहन काढणे (एक्सट्रॅक्शन ऑफ व्हेईकल), नातेवाईक / सहकारी / आणीबाणी क्र. यांना संदेश पाठविणे, हॉटेलसंबधी सहाय्य, २४ x ७ प्रतिसाद केंद्र यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतील.


      वन मोटो इंडियाचे विपणन आणि विक्री उपाध्यक्ष श्री आदित्य रेड्डी म्हणाले, "उत्पादनानंतर उत्तम विक्री सहाय्य पुरविण्यासाठी ब्रँडचा निर्धार आहे. आमच्यासाठी एक अनुभव पुरविणे आणि त्यास टिकवून ठेवणे, दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या बाबी आहेत. ग्लोबल अ‍ॅश्युर सोबतचा संबंध, आमच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे. हा ब्रँड या क्षेत्रातील प्रमुखांपैकी एक आहे आणि त्याच्याद्वारे आमच्या ग्राहकांसाठी सुरक्षितता आणि सुविधा पुरविण्यात मदत केली जाईल.”


     ब्रँडद्वारे त्याच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या पोर्टफोलिओचा काटेकोरपणे विस्तार केला जात आहे. आतापर्यंत त्याच्याद्वारे रस्त्यावर ३ ईव्ही दुचाकी उत्पादने बायका, इलेक्टा आणि कम्युटा आधीच सुरु केली गेली आहेत.


     ग्लोबल अॅश्युर स्ट्रॅटेजिक अलायन्सेस प्रमुख श्री रोहित गुप्ता म्हणाले  “वन मोटो हा, एक प्रीमियम ईव्ही दुचाकी ब्रँड आहे आणि त्याच्याद्वारे प्रमुख घटकाची सेवा करण्याचा प्रयत्न केला असताना, आरएसएससाठी त्यांचा भागीदार म्हणून निवड केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. 


      आमचे विस्तृत नेटवर्क आणि टोल फ्री ग्राहक साहाय्य, त्यांच्या संपूर्ण भारतातील ग्राहकांना ईव्ही चालवणे हा, एक तणावमुक्त अनुभव देईल आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. ई-मोबिलिटी मिशन यशस्वी करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहोत. आणि वन मोटो इंडियासोबतची भागीदारी हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल आहे."

Post a Comment

0 Comments