टीसीएलची सनरायझर्स हैदराबाद सोबत भागीदारी


मुंबई, २१ मार्च २०२२ : जगभरातील लक्षावधी चाहते क्रिकेटचे हे सामने लाइव्ह पाहण्यासाठी तिकिटे काढताना दिसतात तर त्याहून दुप्पट माणसं हे सामने हाय रेझोल्युशनमध्ये पाहण्यासाठी आपल्या टीव्ही सेट्सच्या समोर ठाण मांडून बसलेली दिसतात. 


       या पार्श्वभूमीवर ग्लोबल टॉप-टू टेलिव्हिजन ब्रॅण्ड आणि अग्रगण्य कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएलने सलग तिस-यांदा सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चे अधिकृत पुरस्कर्ते म्हणून आपली कटिबद्धता नव्याने अधोरेखित केली आहे. या कराराचा एक भाग म्हणून टीसीएलचा ब्रॅण्ड लोगो खेळाडूंच्या जर्सीवरील बिना-अग्रेसर बाहूच्या वरच्या भागावर झळकणार आहे.


        हैदराबाद ही टीसीएलसाठीची एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आणि टीसीएल व एसआरएच यांच्या या सहयोगामुळे हा ब्रँड तिथे प्रस्थापित होण्यास तसेच शहरात कंपनीची पाळेमुळे अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे. मैदानावरील धामधुमीतील एखादा क्षण, बॉलची एखादीही करामत ग्राहकांच्या नजरेतून सुटून जाऊ नये यासाठी त्यांना क्रिकेट पाहण्याचा उच्च प्रतीचा, जिवंत अनुभव पुरविण्याचे या जागतिक स्तरावरील टीव्ही कंपनीचे लक्ष्य आहे. एसआरएचबरोबरची भागीदारी सुरू ठेवत टीसीएलने ग्राहकांशी व क्रिकेट जगताशी जपलेले आपले नाते अधिकच बळकट केले आहे आणि खेळांच्या जगात पुरोगामी पवित्रा घेतला आहे.


       टीसीएल इंडियाच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख विजय कुमार मिक्कीलिनेनी म्हणाले, "एसआरएच संघाने सातत्याने अतुलनीय लवचिकता, चिकाटी, कष्ट आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याप्रतीची बांधिलकी यांचे प्रदर्शन केले आहे. यावर्षी भुवनेश्वर कुमार आणि निकोलस पूरन यांच्यासारख्या युवा व अष्टपैलू खेळाडूंवर एसआरएचची मदार आहे. आयपीएल विजेता बनण्याचा सन्मान पुन्हा एकदा मिळविण्याचे संघाचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या युवा खेळाडूंमध्ये आहे. 


      या संघामध्ये तरुण सळसळते रक्त आणि ब-यापैकी अनुभवी खेळाडू या दोघांचाही समावेश आहे, ज्यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनामध्ये आपले स्थान परिणामकारकरित्या तयार केले आहे. एसआरएचबरोबरच्या आमच्या सहयोगामुळे आम्हाला आपले क्रिकेटचे वेड जपण्याची तसेच ग्राहकांना अद्ययावत दर्जाचे टीव्ही पुरविण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून मैदानावरील एकही क्षण त्यांच्याकडून हुकून जाऊ नये."


       टीसीएल हा ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वेगाने विस्तारत असलेला ब्रॅण्ड आहे व या कंपनीने वर्ष २०२१च्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये ३० बिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल गोळा केला आहे. वर्ष २०२२ मध्ये हा ब्रॅण्ड डिस्प्ले तंत्रज्ञान, स्मार्ट उत्पादन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील आपल्या संशोधन व विकास क्षमता वाढविण्याचे आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने काम करत राहील. 


      आपल्या विस्तार धोरणाचा एक भाग म्हणून आणि आपल्या जागतिक स्तरावरील व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी यावर्षीच्या मे महिन्यामध्ये ब्रॅण्डच्या तिरुपती, आंध्र प्रदेश येथे उभारलेल्या आपल्या सर्वात मोठ्या ओव्हरसीज पॅनेल फॅक्टरीतून एलईडी टीव्ही पॅनेल्सच्या निर्मितीला सुरुवात होईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.

Post a Comment

0 Comments