एसएसटी महाविद्यालयाने दिव्यांगांना तीमिरा कडून प्रकाशा कडे दाखवली दिशा


कल्याण : दिव्यांग व्यक्ती या त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत असतात. अशात रोजचा उदरनिर्वाह करत असताना त्यांना बेरोजगारीला देखील सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेत एस.एस.टी महाविद्यालयातील लक्ष युनिट  आणि  समर्थन ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी २६ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


          या रोजगार मेळाव्यात विप्रो, विविधता, तिरंगा अशा तब्बल २१ कंपन्या आल्या होत्या. त्याचबरोबर १३० हून ही अधिक दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घेतला.  सदर रोजगार मेळाव्यात समाज सेवक किशोर सकले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग व्यक्तींना रोजगार कसा मिळवावा तसेच नोकरी संदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये समर्थन ट्रस्ट फॉर डिसेबल्डचे पॅन इंडिया प्लेसमेंट हेड सतीश के., सेंटर हेड मुंबई जितेंद्र कर्णिक आणि प्लेसमेंट ऑफिसर मुंबई शांतीलाल पावरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


          यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे सी पुरस्वानी यांनी उपस्थित सर्व कंपन्यांचे आभार मानत दिव्यांगांसाठी आणखीन कोणत्या उपाययोजना करता येतील अशी इच्छा व्यक्त केली. तसेच यावेळी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. खुशबू  पुरस्वानी देखील उपस्थित होत्या. या संपूर्ण रोजगार मेळाव्याचे आयोजन एन एस एस जिल्हा समन्वयक जीवन विचारे यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एन एस एसचे  प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक योगेश पाटील यांनी केले. तसेच सांगता आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका पद्मा देशपांडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments