आपुलकी व बांधिलकी बचत गटाची वर्षपूर्ती

  


कल्याण : कल्याण मध्ये कार्यरत असलेले महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे आपुलकी व बांधिलकी या महिला बचत गटांचा प्रथम वर्धापन दिन वंजारी भवन कल्याण येथे संयुक्तरीत्या नुकताच साजरा करण्यात आलायावेळी आपुलकी व बांधिलकी बचत गटाच्या संस्थापिका लता पालवे व सल्लागार वंदना सानप या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.


 लता पालवे यांनी आपल्या भाषणात बचत गटासाठी सर्व महिलांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास आपण नक्कीच आपली आर्थिक प्रगती साधू शकतो असे मत मांडले. तर वंदना सानप यांनी बचत गटासाठी जे काय अपेक्षा असेल ते सहकार्य करण्याचे कबूल केले व त्यांनी यावेळी एकात्मते वर आधारित सुंदर कविता सादर केली. प्रेरणा काकड यांनी आपुलकी बचतगटांचे वार्षिक आढावा वाचन केले व मनीषा घुगे यांनी बांधिलकी बचतगटाचे आढावा वाचन केले.


आपुलकी बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी डोमाडे यांनी आपल्या भाषणात आज आपले आपुलकी व बांधीलकी ही आपत्ये एक वर्षाची झाली असून ते अधिक सुदृढ होण्याकरिता सर्व महिलांनी त्याला योग्य खुराक देणे आवश्यक आहे आणि तो खुराक म्हणजे आपण सर्वांनी मिळून महिलांच्या आर्थिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे हा होय.


आपण सर्व मिळून पुढचा वर्धापन दिन साजरा करताना मोठ्या प्रमाणात साजरा करू व आपली प्रगती झालेली आपल्याला सर्वांना दाखवायची आहे यावेळी  जोपर्यंत आमचे बचत गट स्वतःचा व्यवसाय सुरु करत नाही तो पर्यंत पुढील वर्धापन दिन साजरा करणार नाही असे अशी प्रतिज्ञा केली आणि त्यास सर्व महिलांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी प्रेरणा काकड, सारिका घुगे, मनीषा घुगे यांचे आपुलकी बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी डोमाडे यांनी गुलाब पुष्प देऊन कौतुक केले व इतर सर्व महिलांनी देखील सक्रिय सहभाग घेऊन काम करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments