दोन वर्षाच्या प्रतीक्षे नंतर रंगांची उधळण

 


कल्याण : कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळीधुळवडीच्या आनंदाला नागरिक पारखे झाले होते. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनामध्ये संसर्गापासून स्वत:ला वाचविण्याची साऱ्यांचीच धडपड सुरु होती. कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने शासनाकडून काही शहरात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दीड दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेले नागरिकानी आज आपल्या मित्र परिवारासह रंगांची उधळण केल्याची पाहायला मिळाली.   


२०२० ला कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊनमुळे होळी गुढीपाडवारामनवमीचैत्र नवरात्र यासारखे सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालती होती. या काळात अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे प्रत्येक जण कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यापासून धडपड सुरु होती. 


या कोरोनामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्याना आणि आपल्या मित्रांना गमावले. मात्र आता रुग्ण संख्या आणि कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असल्याने यंदा रंगांची बेधुंद उधळण करत असल्याचे पाहायला मिळाले. होळी आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होळी पुजेची आणि रंग, पिचकारी खरेदीसाठी लहान- मोठ्यांनी बाजारपेठेत गर्दी केल्याची दिसली.


रंगपंचमी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विविध ठिकाणी खाजगी जागेवर रंगपंचमीसाठी विविध कार्य्क्रमचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी दोन वर्षानंतर पहिलाच होळी सन आल्याने नागरिकांनी आपल्या परिवारासह रंगपंचमी साजरी करत रंगांची उधळण केली. 

Post a Comment

0 Comments