पाण्यासाठी रिक्षाचालक व नागरिकांचा पालिका कार्यालयावर मोर्चा


डोंबिवली ( शंकर जाधव ) पाणी टंचाईने हैराण झालेल्या महिलांनी गुरुवारी एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन केले होते.तर शुक्रवारी रिक्षाचालकांनी एकत्र येत याच समस्येवर डोंबिवलीतील पालिकेच्या रिजेन्सी येथील कार्यालयात मोर्चा काढला.मोर्च्यात नागरीक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी नागरिक आणि रिक्षाचालकांना दिले.  

 

     रिपब्लिकन रिक्षाचालक रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यात युनियनचे कार्याध्यक्ष विकास देसले, सचिव रामा काकडे, सल्लागार विजय आंबवकर, अमित बनसोडे, भूशन माळी, नथू जाधव, रवी गुरचळ यांसह अनेक रिक्षाचालक, नागरीक आणि महिलावर्ग उपस्थित होते. डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथे गेल्या वर्षभरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे अनेक वेळेला पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्याची भेट घेतली होती. 


      मात्र प्रशासन डोंबिवलीजवळील २७ गावात पाणी पुरवठा योग्य दाबाने केला नाही.अनेक ठिकाणी नागरिकांनी हंडा-कळशी मोर्चा, उपोषण करून आपली समस्या मांडली.परंतु त्यावर तोडगा निघत नसल्याने शुक्रवारी पुन्हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता कुलकर्णी यांना जाब विचारला.यावर कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे मोर्चेकऱ्यांना आश्वस दिले.यावर काकडे यांनी आश्वासन पूर्ण केले नाही तर पुढील आंदोलन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

Post a Comment

0 Comments