युक्रेन वरून भिवंडीत मुलगा सुखरूप घरी परतला आणि आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला...


भिवंडी : दि.07 (आकाश गायकवाड  ) युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या प्रीतम हा सुखरूप घरी परतल्या नंतर ठाणे जिल्ह्यात समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे वडील सोन्या पाटील व त्यांची पत्नी यांचा अश्रूंचा बांध फुटला अत्यंत हृदयद्रावक दृश्य पहिल्या नंतर  तेथे प्रीतमच्या स्वागतासाठी उपस्थित सर्वांचे सर्वांचेच डोळे आनंदअश्रूंनी डबडबले. 
       

          भिवंडी शहरातील प्रीतम सोन्या पाटील हा पश्चिम युक्रेन भागातील लविव असलेल्या डायनलो हलेसकी लविव नॅशनल मेडिकल कॉलेज या ठिकाणी 5 व्या वर्षात  वैद्यकीय शिक्षण घेत होता .युद्धाचा झळा त्या शहरात कमी जाणवत असल्या तरी रात्र यांना बंकरमध्ये जागून काढावी लागत होती. दरम्यान भारतीय दुतावासा कडून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी कोणती हालचाल दिसून न आल्याने तब्बल 110 विद्यार्थ्यांनी खाजगी बस च्या  माध्यमातून 1 मार्च रोजी लविव शहर सोडले. 26 तासाच्या खडतर प्रवासानंतर हंग्री या देशाच्या सीमेवर येऊन पोहोचले.


     
          त्याठिकाणी श्री श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग  या सेवाभावी संस्थेच्या आश्रमात या मुलांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती . या ठिकाणी विद्यार्थी असल्याची माहिती भारतीय दूतावासास नसल्याने मुलांना  तीन दिवस या ठिकाणी अडकून राहावे लागले त्यानंतर मुलांनी दूतावासात मागणी करून आम्हाला ही मायदेशी जायचे आहे असे तगादा लावल्याने  नुकताच प्रीतम सह शेकडो विद्यार्थी दिल्ली मार्गे आपापल्या घरी पोहोचले आहेत त्यामध्ये प्रीतम सोन्या पाटील या विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.


          शिक्षण पूर्ण होत आला असतानाच मायदेशी निघून यावे लागले याचे दुःख मनात असले तरी सुद्धा युक्रेनवरील हल्ल्यात  भयान झालेले परिस्थिती बघितल्यानंतर मायदेशी परत येण्याची ओढ देखील तेवढीच लागली होती आणि त्यामुळेच आज घरी आल्याने खरा आनंद गगनात मावत नसून पुढील शिक्षण कसे पूर्ण होणार याची चिंता जरी असले तरीसुद्धा मी आज माझ्या कुटुंबियांच्या सानिध्यात पो पिसावलो त्यामुळे मी खरंच आनंदित आहे.


        अशी प्रतिक्रिया प्रीतम सोन्या पाटील यांनी दिली आहे तर  यूक्रेन येथील युद्धाचे खबर जसजशी कानावर पडत होती तसतसे काळजाचा ठोका चुकत होता सगळ्यांच्या प्रयत्नाने प्रितम आमचा घरी पोहचला तसेच सर्व विद्यार्थी सुखरूप आपापल्या घरी पोहोचोत अशी प्रतिक्रिया सोन्या पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments