ते हरविलेले वृद्ध तरुणांच्या मदतीने घरी परतले

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) हरविलेल्या एका वयवृद्धास डोंबिवलीतील तरुणांनी मदत करत त्यांच्या घरी सोडले.मनोहर माळी हे ८० वर्षीय वृद्ध सोमवारी हरविले होते.क्रिकेटपटू दर्शन आढारकर आणि मनोहर म्हात्रे, प्रमोद फुटे, मयूर भोसले, रुपेश चव्हाण, पाडुरंग निगम त्यांच्या मित्रांनी वृद्धास पहिले.माळी यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली असता माळी यांना त्यांचा घरचा पत्ता नीट सांगत येत नव्हता.दर्शन व त्याच्या मित्रांनी वृद्धास विष्णूनगर पोलिस ठाण्यात घेऊन गेले.पोलिसांना ते व्यवस्थित पत्ता सांगू शकले नाही.माळी हे डोंबिवली पश्चिमेकडील एका उद्यानाजवळील इमारतीत राहत असल्याचे सांगत होते.


       दर्शने वृद्धास उद्यानजवळ घेऊन जाण्यास ठरविले. इतक्यात माळी यांचा मुलगा पोलीस ठाण्यात आला असता त्याला समोर वडील दिसले. आपल्या वडिलांना  पोलीस ठाण्यात कोणी आणले असा प्रश्न त्यांच्या मुलाने पोलिसांना विचारला असता त्यांनी दर्शन आणि त्यांच्या मित्रांनी पोलीस ठाण्यात आल्याचे सांगितले.यावर माळी यांच्या मुलांनी दर्शन व त्याच्या मित्रांचे आभार मानले.तसेच पोलिसांनी जागरूक नागरीक आपले कर्त्यव्य बजावणाऱ्या दर्शन व त्याच्या मित्रांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments