कल्याण पूर्वेतील कोकण महोत्सवास नागरिकांची पसंती

  


कल्याण : कल्याण पूर्वेतील कोकण महोत्सवात नागरिकांना बहारदार व भरगच्च अशा कार्यक्रमांची मेजवानी मिळत असल्याने नागरिकांची पसंती या मोहोत्सवाला मिळत आहे. मंगळवारी पाचव्या दिवशी किरण पाटील प्रस्तुत रंग मराठी मनाचा महा शिवतांडव या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मराठमोळ्या साझ व ठेवणीतल्या लोकप्रिय गीतातून,  लावणीच्यां माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले तसेच महाशिवरात्रीचे औचित्य साधून महा शिव तांडवाचा देखील कल्याणकर रसिकांना आस्वाद घेता आला.


 मनोरंजन व खाद्य संस्कृती जोपासत असता कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान प्रत्येक दिवशी विविध स्तरावरील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करीत असते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षसंजय मोरे यांच्यासह स्वागत अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित मान्यवराचा सन्मान करण्यात आला. यात श्री तीसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाडमहाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटीलनगरसेवक विष्णू गायकवाडउद्योजक राजेश म्हात्रेमॉडेल इंग्लिश स्कूल ट्रस्टी कैलास सुर्वेयांना सन्मानित करण्यात आलं.. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा कट्टा यांच्या सदस्यांच्या हस्ते संजय मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.


संजय मोरे यांनी दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वराज्य अपंग संस्था स्थापना करून दिव्यांगांना विविध स्तरावर सहाय्य करण्यासाठी योजना  आखून त्याचा शुभारंभ उपस्थित  दिव्यांग वेदांत कांबळे यांना स्मार्ट केअर हिअरिंग ऍड (श्रवण यंत्र) आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सुपूर्त केले. पाचव्या दिवशी नागरिकांचा उत्साह पाहता कोकण महोत्सव २०२२ यांच्या आयोजनात पुढील ५ दिवसही कमी पडतील अशा उपस्थितांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या महोत्सवासाठी सुभाष म्हस्के, संदीप तांबे, अजय पवार, दीपक गायकवाड, संतोष गुरवउत्तम पवार, कैलास कालेकर, संतोष परब आदी पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments