हिंदुत्वाच्या मुद्दावरून शिवसेना - भाजपत आरोप-प्रत्यारोप

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदुत्वासाठी शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन युती बनवली.आज मात्र या दोन्ही पक्षात बिनसल्याने हे दोन्ही पक्षांचे एकमेकांना हिंदुत्वाच्या मुद्दावरून आरोप –प्रत्यारोप करणे सुरु झाले आहेत. विकासाचा मुद्दा हा राजकीय आहे हे नागरिकांना नवीन नाही.मात्र हिंदुत्व या मुद्द्यांवर आरोप करत डोंबिवलीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले असल्याचे दिसते.शिवजयंती साजरी करताना शिवसेनेने बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो न लावता छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावल्याचा फोटो लावल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. तर शिवसैनिकांना भाजपने हिंदुत्व शिकवू नये अश्या शब्दात शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी उत्तर दिले.


     छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो न लावता छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावल्याचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यावर टीका करताना दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना हिंदुत्व कसे समजणार असा प्रश्न उपस्थित केला.यावर शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत भारतातील प्रत्येक नागरिकांच्याच्या रक्तात हिंदुत्व आहे.त्यामुळे कोण कुठल्या पक्षातून आला हे पाहणे चुकीचे आहे.


      भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी उल्हासनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेऊन उभे होते.भाजपने विकासाच्या मुद्द्यावर बोलले तर बरे होईल. शिवजयंतीला डोंबिवलीत काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी आमदार चव्हाण हे भेटले होते.त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्यास सांगितले असता त्यांनी मात्र यावर काहीच उत्तर दिले नाही.भाजपने आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली नाही.


  चौकट

 

शिवसेना शहरप्रमुख पदाची चर्चा तर होणारच...

 अनेक राजकीय पक्षातील शहरअध्यक्षांची नेमणूक होते असते.मात्र शिवसेना शहरप्रमुख पद हे चर्चा तर राहणारच.शिवसेना शहरप्रमुख पदावर नेमणूक करताना वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेत असतात.  माझे समाजातील स्थान, सामाजिक कार्य आणि राजकारणातील उंची यावर मला शिवसेना शहरप्रमुख पद दिले आहे असे डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत संगितले.

Post a Comment

0 Comments