एक्सपिरीया मॉलची महिलांसाठी यु डिझर्व इट मोहीम


कल्याण : एक्सपिरीया मॉलने महिलांसाठी यु डिझर्व इट मोहीम राबवत महिला दिन साजरा केला. सर्व वयोगटातील महिलांना खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफरलाइव्ह संगीत सादरीकरण आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली. एक्सपिरीया १००ने हून अधिक महिलांचा सत्कार केला. ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट प्रयत्नांद्वारे समाजासाठी  योगदान दिले होते. 


           यामध्ये डॉक्टरपरिचारिकाशासकीय कर्मचारीपोलीसपत्रकारखेळाडूसामाजिक कार्यकर्त्या आणि अभिनेत्री सुष्मिता सिंगयशश्री उपासनीनम्रता प्रधान आणि विजया कदम यांच्यासह आगामी गायिका अक्षया अय्यर आणि अंशिका चोणकर यांचा समावेश होता.


यावेळी रोहिणी लोकरे (अभियांत्रिकी विभाग केडीएमसी), अंजली जोगळेकर (अध्यक्ष इनरव्हील क्लबडोंबिवली)डॉ. पौर्णिमा भट (अग्रणी मॉडेल आणि निसर्गोपचार तज्ञ) आणि बशीर शेख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – कोळसेवाडीकल्याण) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी कलाकार सुप्रसिद्ध निवेदक प्रणव भांबुरे यांनी केले. तर आठवणीत राहील अशी संध्याकाळ अनुभवली असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.

Post a Comment

0 Comments