चिंचपाडा गावातील ज्योती नगर मधील महिलांनी आय प्रभाग कार्यालया बाहेर मांडला ठिय्या

■रस्ता, पाणी, लाईट नसल्याने मोर्चा काढत प्रभाग कार्यलयावर दिली धडक..


कल्याण : चिंचपाडा गावातील ज्योती नगर मधील महिलांनी रस्ता, पाणी, लाईट या सुविधा नसल्याने आय प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत प्रभाग कार्यलयावर धडक देत ठिय्या मांडला.


कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावातील ज्योती नगर मध्ये रस्तालाईटपाणी याची गेले तीन ते चार वर्षांपासून मोठी समस्या आहे.  याकरिता स्थानिक रहिवाशांनी आय प्रभाग कार्यालय आणि मुख्यालयापासून पत्रव्यवहार करून, मोर्चे काढून देखील  दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ज्योती नगर मधील महिला  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  आय प्रभाग  कार्यलयाबाहेर ठिय्या आंदोलन करून बसल्या. 


यानंतर बांधकाम विभागाकडून बालाजी पॅरेडाइज् जवळील रस्ता खड्डा भरून  दोन दिवसात दुरुस्त करून देतो असे आश्वासन  केडीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. केडीएमसी च्या लेखी आश्वासनानंतर महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. लाईटपाण्याची समस्या देखील तात्काळ पलिकीले कडून सोडवली जाईल असे आश्वासित करण्यात आल्याचे प्रचिती कदम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments