एमजी मोटर इंडिया व पीपीजी एशियन पेंट्स कडून प्रतिवर्ष १५०० टन कार्बन डाय ऑक्साईड कमी करू शकणारे तंत्रज्ञान लॉंचमुंबई, ३ मार्च २०२२ : एमजी मोटर इंडियाने स्थिरतेप्रती आणखी एक पाऊल उचलले आहे. कंपनी पीपीजी एशियन पेंट्सने विकसित केलेले लिक्विड अल्कालाइन डिग्रिजिंग क्लीनर अल्ट्राएक्स डिग्रिजर वापरण्यासाठी नुकतेच जगातील पहिली ऑटोमोटिव्ह ब्रॅण्ड बनली आहे. डिग्रिजिंग प्री-ट्रीटमेण्ट केमिकलचे लॉंच ब्रॅण्डच्या स्थिर हरित गतीशीलता निर्माण करण्यावरील फोकसशी संलग्न आहे, ज्यामुळे प्रतिवर्ष ७८७ टन कार्बन डायऑक्साईड कमी होतो.


       अल्ट्राएक्स डिग्रिजर व्यतिरिक्त एमजी मोटर इंडिया लो-टेम्परेचर फॉस्फेट (व्हर्साबॉण्ड) आणि हाय थ्रो लो क्युअर कॅथोडिक इलेक्ट्रो कोटिंग पेंटच्या माध्यमातून ऊर्जेचे जतन करते, ज्यामुळे अनुक्रमे प्रतिवर्ष ३२५ टन आणि प्रतिवर्ष ३८८ टन कार्बन डायऑक्साईड कमी होतो. ही नवीन तंत्रज्ञाने कंपनीला एकूण प्रतिवर्ष १५०० टन कार्बन डायऑक्साईड कमी करण्यामध्ये साह्य करतील.


        एमजी मोटर इंडियाच्या उत्पादन विभागाचे संचालक रवी मित्तल म्हणाले, "#चेंजव्हॉटयुकॅन मोहिमेच्या माध्यमातून एमजी मोटर इंडिया पर्यावरण व समाजाप्रती सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवोन्मेष्कार सादर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पीपीजी एशियन पेंट्स अल्ट्राएक्स व व्हर्साबॉण्डने आम्हाला पीटीसीईडी लाइन येथील प्री-ट्रीटमेण्ट प्रक्रियेमध्ये तापमान कमी करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे स्थिर ऊर्जा संवर्धनाप्रती योगदान देता आले आहे


        यामुळे आमच्या कार्यसंचालनांच्या कार्यक्षमतेमध्ये अधिक वाढ झाली आहे आणि आमच्या एकूण खर्चांमध्ये कपात झाली आहे. आम्ही कार्बन डायऑक्साईड स्थिररित्या कमी करण्यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी पीपीजी एशियन पेंट्सचे आभार मानतो."


       पीपीजी एशियन पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग सहाय म्हणाले, "आम्हाला अल्ट्राएक्स एलटी८६२० च्या लॉंचचा आनंद होत आहे. तसेच आम्हाला एमजीला सोल्यूशन्स देण्याचा देखील आनंद होत आहे. आमचा सहयोगाने अधिक स्थिर तंत्रज्ञानांवर काम करण्याचा मनसुबा आहे. एमजी मोटर इंडियासोबतचा सहयोग ऊर्जा संवर्धनाला चालना देण्यामधील लक्षणीय पाऊल आहे आणि आम्हाला ब्रॅण्डच्या स्थिरता उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे."


       एमजी मोटर इंडिया पर्यावरणावर सकारात्मक परिणाम निर्माण करण्यासाठी नेहमीच मार्गांचा शोध घेते. कंपनीने नुकतेच हलोल उत्पादन केंद्रामध्ये त्यांचे कार्यसंचालन सुरू करण्याकरिता ४.८५ मेगावॅट पवन-सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी क्लीनमॅक्ससोबत सहयोग केला, ज्यामुळे १५ वर्षांमध्ये २ लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडचा वापर कमी होईल. कंपनीने ड्राय कार वॉशिंगला चालना देण्यासाठी आणि लोकांना प्रतिमहिना जवळपास १४ लाख लीटर्स पाण्याची बचत करण्यामध्ये प्रोत्‍साहित करण्यासाठी त्यांच्या नवीन उपक्रमाची (एन्व्हायरो वॉश) देखील घोषणा केली आहे. 


         ईव्हींसाठी एमजी मोटरने अट्टेरोसोबत सहयोग केला आहे, ज्याअंतर्गत भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्सच्या लि-आयन बॅट-यांचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करण्यात येईल. टीईएस-एएमएमसोबत कंपनीचा सहयोग देखील पर्यावरण स्थिरता आणि देशामध्ये ईव्ही बॅट-यांच्या सुरक्षित पुनर्चक्रणाची खात्री घेतो. 

Post a Comment

0 Comments