स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं एकतावादी ताकदीने उतरणार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय


ठाणे (प्रतिनिधी)  -  येणार्‍या काळात होऊ घातलेल्या सर्वच महानगर पालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये रिपाइं एकतावादी हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात येईल, असा निर्णय रिपाइं एकतावादीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 


           रिपाइं एकतावादीची राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष तथा भिवंडी महानगर पालिकेचे विद्यमान सभागृह नेते विकास निकम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी वर्तक नगर येथे पार पडली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे, राष्ट्रीय महासचिव प्रल्हाद सोनावणे, उत्तम खडसे, राहूल मून यांच्यासह राज्यभरातील सर्वच जिल्हाध्यक्ष, विभागिय अध्यक्ष उपस्थित होते.


        या बैठकीमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, नागपूरसह अन्य नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये रिपाइं एकतावादीने आपले उमेदवार उभे करावेत, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 


         त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविताना समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत सुतोवाच केले.


        तसेच, आगामी काळात ज्या ठिकाणी सर्व रिपाइं गटांचे एकीकरण करुन निवडणुका लढविणे शक्य आहे; तिथे रिपाइं एकतावादी पुढाकार घेऊन रिपब्लिकन फ्रंट निर्माण करेल, असेही जाहीर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments