कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचे अनेक वर्षापासून सुरु असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना खऱ्या अर्थाने उपचार मिळण्याचे चित्र निर्माण झाले आहे. पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आयएमएच्या मदतीने रुग्णालयात हाडांच्या, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाची सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे. रुग्णालयात मोड्यूलर शस्स्त्रक्रिया कक्ष तयार करण्यात आला असून या विभागात प्रत्येक आठवड्यात ३ ते ४ शस्त्रक्रिया केल्या जातात.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याणातील रुक्मिणीबाई आणि डोंबिवली तील शास्त्रीनगर अशी दोन रुग्णालये असली तरी या रुग्णालयात रुग्णाना कोणतेही उपचार मिळत नसल्याने हि रुग्णालये नावापुरतीच उरली होती. शहरात खाजगी रुग्णालये झपाट्याने उभारत या रुग्णालयात रुग्णाची लुट सुरु असल्याने पालिकेची आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.
मात्र आजवर त्या दृष्टीने प्रयत्न झालेले दिसले नाहीत. मात्र पालिका आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताना आश्वासन दिल्याप्रमाणे करोना रुग्णसंख्या कमी होताच रुग्णालयासाठी कायापालट अभियान राबविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. क्रिस्ना डायग्नोस्टीक लॅबच्या मदतीने दोन्ही रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन सह सर्व प्रकारच्या तपासण्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयातील लब लवकरच सुरु केली जाणार असून मागील काही महिन्यापासून रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया सुविधेचा रुग्णांना चांगला लाभ होत आहे. हाडांच्या, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जाऊ लागल्या आहेत. गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई,ठाण्यात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचल्या असल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
तर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या पाहता बाह्यरुग्ण कक्षाचा विस्तार पर्यायाने रुग्णालयाचा विस्तार केला जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
0 Comments