कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात खडवली, वावेघर गावातील नागरिकांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असून स्मशानभूमी नसल्याने खडवली वावेघर येथील नागरिकांची परवड होत आहे. याठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याने लवकरात लवकर हा भूखंड ताब्यात घेऊन याठिकाणी स्मशानभूमी बांधावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा आणि एखाद्याचे निधन झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतावर अंत्यसंस्कार करण्याचा इशारा खडवली मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
खडवली ग्रुप ग्रामपंचायत असून या क्षेत्रातील लोक वस्ती ही पाच ते सहा हजाराच्या पलीकडे असून ही ग्रामपंचायत मुरबाड विधानसभा मतदारसंघात येते. तसेच या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी याच गणातून ठाणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष व कल्याण पंचायत समितीला सभापती दिला. या क्षेत्रात प्राथमिक पायाभूत सुविधांचा बोजवारा तर आहेच. तेथील नागरिकांना त्यांच्या हयातीत सुविधा अभावी होणारा त्रास सहन करावा लागतोच, परंतु त्यांच्या मरणानंतरही मृताच्या देहाची होणारी विटंबना ही दुर्दैवीच आहे.
या क्षेत्रात स्वा
याबाबत स्मशानभूमी बांधकाम निर्मितीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पदरी उपेक्षाच आली आहे. स्मशानभूमी अभावी येथील नागरिकांना मृत देहाचे अंत्यसंस्कार करताना रात्री-अपरात्री जंगलाची काटेरी वाट तुडवत नदीपात्राकडे जावे लागते, कधी तर मुसळधार पावसात मृताचे अर्धवट जळालेले शरीर वाहून जाते तर कधी भटक्या कुत्र्यांच्या भक्षास बळी पडते.
नुकतेच याठिकाणी रात्रीच्या सुमारास मृत शरीराची अंतयात्रा नेतांना येथील रेल्वे फाटक दररोज संध्याकाळी ७ वाजल्यानंतर बंद होत असल्याने लोकांनी जीव धोक्यात घालून खांद्यावरचा प्रेत हातावर घेऊन रेल्वेगाडीच्या भीतीने कितीतरी वेळ ताटकळत राहावे लागले. हा सर्व दुर्दैवी प्रकार कधी थांबेल ? आणि मेल्यानंतरही होणारी विटंबना केव्हा थांबेल? इतक्या वर्षांनंतर आजही स्मशानभूमी शासनाकडून बांधले जाईल का ? ग्रामपंचायत स्मशानभूमी बांधण्याकडे गांभीर्याने पाहिल का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
एका महिन्याच्या आत जर आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन दोन ते तीन स्मशानभूमी बांधली गेली नाही तर येथील संतप्त नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. याची शासनाने दखल घ्यावी व पुन्हा प्रेताच्या अंत्यसंस्काराची वेळ आली तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी केला जाईल असा इशारा अॅड्. सचिन शेळके, निसर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कशिवले, महिला कार्यकर्त्या सुनीता शेळके, आरपीआय अध्यक्ष अशोक रातांबे यांनी दिला आहे.
0 Comments