सोन्याची चेन लांबविणाऱ्या दोघे गजाआड


डोंबिवली  ( शंकर जाधव )  वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने चोरून नेणाऱ्या चोरट्यास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संतोष तेलंगे असे या आरोपीचे नाव असून तो मोहने गावात राहणारा आहे. 
     

            पोलिसांमधून मिळालेल्या माहीतीनुसार,
 पोलीस महात्मा फुले चौक परिसरात गस्त घालत  असताना सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी कल्याणमधील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन खेचून पळून गेलेला इसम हा कल्याणमधील सोनाराकडे सोने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती.


           या  मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनार गल्ली याठिकाणी सापळा रचून संतोष तेलंगे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १४.८०० ग्रॅम वजनाची ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हस्तगत करून त्याला पुढील कारवाईसाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आले. 


        कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश साळवे हा कोळेगांव फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना माहीती मिळाली.पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. गणेशला पुढील कारवाईकरीता महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


         या दोन्ही कारवाया कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वपोनि किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कवडे, जमादार संजय माळी, हवा. विश्वास माने, बापूराव जाधव, उल्हास खंडारे, अनुप कामत, सचिन साळवी, महेश साबळे, श्रीधर हुंडेकरी, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, विजेंद्र नवसारे, राहुल ईशी यांनी केली.

Post a Comment

0 Comments