नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक असणाऱ्या ज्योती राजकांत पाटील यांची भाजपच्या दिवा महिला अध्यक्ष पदी नियुक्ती!


ठाणे, दिवा :-  दिवा शहरातील महिलांचे नेतृत्व करणाऱ्या, नागरिकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या,तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ ज्योती राजकांत पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या  दिवा शहर मंडळ महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर साहेब व जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे साहेब यांच्या उपस्थितीत ठाणे शहर महिला अध्यक्ष मृणाली पेंडसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


         यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे साहेब, संघटक सरचिटणीस विलास साठे साहेब, सरचिटणीस जिल्हा मनोहर सुगदरे साहेब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सारंग मेढेकर, दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत, माजी नगरसेवक अशोक पाटील, विजय भोईर,राजकांत पाटील, मंडल सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव,युवा मोर्चा अध्यक्ष दिवा सचिन भोईर,श्रीराम भगत, जयदीप भोईर,आशिष पाटील,निलेश भोईर, नागेश पवार, राहुल साहू, प्रफुल साळवी, वीरेंद्र गुप्ता, अशोक सोळंकी,आनंदा पाटील, रामबाबू सोनी, अवधराज राजभर, आदी दिवा शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


       अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथे हा कार्यक्रम पार पडला. ज्योती पाटील या भाजप मध्ये आल्याने दिवा भाजप मजबूत झाली असल्याचे बोलले जात आहे.आक्रमक स्वभावामुळे ज्योती पाटील या महिलांच्या अनेक प्रश्नांवर  रोखठोक आवाज उठत असतात. महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ज्योती पाटील तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहेत. नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 


      त्यानंतर भाजप नेतृत्वाने ज्योती पाटील यांच्यावर दिवा शहर महिला मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ज्योती पाटील या महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक असल्याने येणाऱ्या काळात सत्ताधारी सेने विरोधात त्या तगडे आव्हान करतील असं बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments