डोंबिवली ( शंकर जाधव ) पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचा ढोल शिवसेना-भाजपने बडवला असला तरी वास्तविक पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे.स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पाणी प्रश्न सोडवू नसल्याने संतापलेल्या महिलांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन केले.
काही वेळाने महिलांनी कार्यकारी अभियंता आर.पी पाटील यांची भेट घेतली असता पाणी वितरण व्यवस्था पालिका प्रशासन करत असून तिकडे आंदोलन करा असे सांगितल्यावर संतापलेल्या महिलांनी पाटील यांना चांगलेच झापले. आमचा फुटबॉल करू नका... पाणी मिळत नाही तोवर दररोज आंदोलन करू असा इशारा दिला.
डोंबिवली पूर्वेकडील देशमुख होम्स येथे रहिवासी अनेक वर्षापासून पाणी टंचाईने हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनकडे हेलपाटे मारूनही तोगडा निघत नसल्याने अखेर येथील समाजसेविका वंदना सोनावणे यांसह महिलांनी एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.आंदोलन कर्त्या महिलांनी एमआयडीचे कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेतली.पाणी बिल भरूनही आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येतेय. कल्याण-डोंबिवली महानगरपालिके रहायला आलो ही आमची चूक आहे का ?
असा प्रश्न सोनावणे यांनी यावेळी उपस्थित केला. यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो.पाणी वितरण व्यवस्था पालिका प्रशासनाची आहे.त्यामुळे पालीकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करा असे कार्यकारी अभियंता पाटील यांनी आंदोलनकर्त्या महिलांना सांगत हात वर केले. यावर महिला वर्गांनी वैतागून नागरिकांचा फुटबॉल करू नका. पाणी मिळेपर्यत आम्ही दररोज आंदोलन करू असा इशारा दिला.
अधिकारी बदलतात पण प्रश्न सुटला नाही. आंदोलन केल्यावर दोन दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित होतो. नंतर पुन्हा तशीच परिस्थिती राहते. त्यामुळे आता सहन होत नाही. पाणी बिल पण भरायचे आणि पाणी मिळत नसल्याने टॅकरला पैसे मोजायचे. आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. २७ गावांना एकत्र घेऊन एमआयडीसी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा सोनावणे यांनी यावेळी दिला.
चौकट
पाणी देणे आवश्यक असल्याने पालिकेची ५०० कोटी पाणी बिल थकबाकी आहे.२०२० ते २०२२ या कोरोना काळात केडीएमसीने एकही पैसा भरला नाही.जनतेच्या आरोग्यावर पालिका प्रशासने प्राधान्य दिल्याने तिकडे पैसे खर्च झाले.त्यामुळे आम्हीही पाणी पुरवठा सुरळीत ठेवला असल्याची माहित एमआयडीसी कार्यकारी अभियंता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
■आंदोलन केल्यावर दोन दिवस पाणी वितरण व्यवस्थित कसे होते ?
पाण्यासाठी महिलांना आंदोलन करावे लागते.हिचा का स्मार्ट सिटी आहे का ? ज्या ज्या वेळी नागरिकांनी आंदोलने केली, त्यानंतर दोन – तीन दिवस पाणी पुरवठा सुरळीत झाला. आताही तसेच होणार आहे.म्हणूनच दररोज आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे वंदना सोनावणे यांनी सांगितले.
■पाणी नसल्याने घरी पाहुण्यांना बोलावू शकत नाही..
घरी पुरेसे पाणी नसल्याने घरी पाहुण्यांना बोलावू शकत नाही, अशी आमची अवस्था झाली.या परिस्थितीला पालिका प्रशासन आणि एमआयडीसी विभाग जबाबदार आहे. एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल केल्याने आम्ही आम्ही २७ गावांश मोठे आंदोलन करू असा इशारा आंदोलन कर्त्या महिलांनी दिला.
0 Comments