एमआयडीसी मध्ये शाळे समोर झाड पडले


कल्याण : डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर ग्रिन्स स्कूल समोर आज पहाटे एक बदामाचे झाड पडले. त्यावेळी सुदैवाने कोणीही तेथून जात नव्हते. येथील या परिसरात मॉर्निंग वॉक साठी नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असतात शिवाय शाळा जवळ असल्याने सकाळी विद्यार्थीपालकवाहने येत असतात.


 उन्हाळ्याच्या या दिवसांत झाड पडल्याने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रमाण वाढणार आहे असे दिसते. याला कारण म्हणजे एमआयडीसी मध्ये नवीन गटारीनाले बांधताना आणि अनेक कंपन्या त्यांचा केबल टाकतांना रस्ते खोदाई मुळे काही झांडाच्या मुळांना, खोडांना धक्केमार बसल्याने सदर झाडे कुमकुवत झालेली आहेत. येथे असलेल्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांनी तीस पस्तीस वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. सदर ही झाडे आता मोठी झाली असून काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत. काही झाडांच्या फांद्या हाय टेन्शन वायर जवळ आल्या आहेत.


केडीएमसी, महावितरणने एमआयडीसी निवासी मधील सर्व झाडांचे सर्वेक्षण येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी तातडीने करून घ्यावे आणि योग्य ती कार्यवाही करावीजेणेकरून पावसाळ्यात झाडे पडण्याच्या तसेच वीज पुरवठा खंडित होण्याचा घटना रोखता येतील प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments