राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या उपस्थितीत भिवंडी ते विधान भवन आक्रोश मोर्चा.भिवंडी दि 9(प्रतिनिधी )  महाराष्ट्रातील 28 हजार ग्रामपंचायती मध्ये कार्यरत तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतना सह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचयात कर्मचारी युनियनच्या माध्यमातून विधानभवना वर आक्रोश मोर्चा चे आयोजन भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली येथून सुरू झालेल्या या मोर्चात विविध जिल्ह्यातून आलेले हजारो कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.  महाराष्ट्रातील 28 हजार ग्रामपंचायती मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी कामगार यांना पुरेसे किमान वेतन मिळावे , ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अनुदान मंजूर केले आहे .


          सदर वेतन अनुदान ग्रा. पंचायत खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेऊन ही त्याची अंमलबजावणी होत नसून 2013 च्या वेतन नियमा नुसार वेतन मिळत असल्याने कामगार कर्मचारी यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याने त्या विरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मनात खदखद असून त्यासाठी युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार ,राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, ठाणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांसह अनेक पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मानकोली येथून सूरु झालेल्या मोर्चाला पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी समोर जात मोर्चा न काढता शिष्टमंडळ मुंबई येथे घेऊन जावे तेथील चर्चा सकारात्मक न झाल्यास मोर्चा सुरू राहील असे सांगत तूर्तास मोर्चा अंजुर दिवे येथे थांबविण्यात आला आहे .


            हा मोर्चा मानकोली येथून सुरू झाल्या नंतर हायवे दिवे येथे पोलिसांनी अडवून धरला असता केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मोर्चा ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारून कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत ,राज्य शासनाने 2018 मध्ये स्वीकारलेला अहवाल धूळखात ठेवल्याने महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ आणली अशी माहिती देत ,आपण या विषयी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments