डोंबिवलीकर रहिवाशाच्या पुढाकाराने नागेश वाडीत नशामुक्त होळी महोत्सव उत्साहात

 


कल्याण : उमरखेड तालुक्यातील निंगणूर गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे डोंबिवलीतील रहिवासी देविदास चव्हाण यांच्या प्रयत्नातून प्रथमच नशामुक्त होळी महोत्सवाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून  देविदास चव्हाण यांच्या समाज कार्यातून व आध्यात्मिक विचाराने प्रभावित होऊन जवळपास पाच तालुक्यातील दोन हजार जण नशामुक्त झाले. यामुळे येथील हजारो महिलांचे संसार उद्ध्वस्त होतांना वाचले आहेत.


नागेशवाडी येथे बंजारा समाज (तांडा) वास्तव्यास आहे. मागील दहा वर्षात प्रौढ तसेच नवतरुण वर्ग सुद्धा व्यसनाच्या आहारी गेल्याने परिवाराची मानसिक व आर्थिक हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. अशा बिकट परिस्थितीत देविदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात नागेशवाडी येथील बंजारा समाज तांडा पूर्ण नशामुक्त झाला आहे. त्यामध्ये विदर्भमराठवाड्यातील नागरिकांचा समावेश आहे.


या प्रसंगी नागेशवाडी येथील प्रल्हाद नाईककैलास राठोडकमलसिंग राठोडसतीश जाधव यांच्यासह नागेशवाडी येथील नागरिकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच अंकुश राठोड यांनी केले. संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचे वचन सेन साई वेस' 'केसूला नई गोर मोरीय' 'गोरू कोरून साई वेस' 'बार बार कोसेप दिवो लागिययाची प्रचिती अध्यात्मिक सत्संगामुळे समाज बांधवांना येत आहे. या नशामुक्त होळीला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.


नागेशवाडीमधील तरुणांना नशामुक्त करण्याचा प्रयत्न चालू होता. याकरिता डोंबिवली येथील रहिवासी देविदास चव्हाण यांनी पुढाकार घेतला. गावातील शंभर टक्के जनता नशामुक्त झाली असून त्याचअनुषंगाने नशामुक्त होळी साजरी केली असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य अंकुश राठोड यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments