दिव्यात शिवसेनेला भाजपचा दणका, ज्योती पाटील यांचा शेकडो महिलांसह भाजपात जाहीर प्रवेश!

केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत प्रवेश,दिव्याच्या विकासासाठी भाजप परिवर्तन घडवणार,भाजप नेत्यांचा दावा..


ठाणे, दिवा :- दिवा भाजपने शिवसेनेला जोरदार दणका दिला असून महिलांच्या प्रश्नांवर दिव्यात काम करणाऱ्या व पाच वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या  तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटील यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.


        त्याचबरोबर शिवसेनेचे उपविभाग प्रमुख राजकांत पाटील व शेकडो महिलांनी सुद्धा ज्योती पाटील यांच्या सोबत मंगळवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांसह भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे,नगरसेवक कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.


       यावेळी बोलताना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील म्हणाले की,दिव्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता भाजपची ज्योत लागल्याशिवाय राहणार नाही,ज्योती पाटील यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल असेही कपिल पाटील म्हणाले.दिव्यात विकासकामे करण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही असे सांगताना आमदार संजय केळकर म्हणाले की दिव्यातील समस्या वर आवाज उठवण्यासाठी कधीही हाक मारा आम्ही त्यावेळी हजर असू असे केळकर म्हणाले.


        दिव्यातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना सोयी सुविधा न दिल्याने महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात दिव्यात परिवर्तन नक्की होणार असा विश्वास भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. दिव्यातील जनता नेहमीच्या समस्यांना कंटाळली असून यावेळी जनता शिवसेनेला जागा दाखवणार व भाजपचे नगरसेवक निवडून देणार असा विश्वास दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.


         भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याबाबत सौ.ज्योती पाटील म्हणाल्या की,महिलांचे दुःख मी पाहतेय,दिव्यातील महिलांना येथील समस्यांचा सर्वाधिक त्रास होतो. पाणी समस्ये मुळे  महिला हैराण आहेत.महिलांना न्याय देण्यासाठी महिलांच्या आग्रहाने आपण हा निर्णय घेत असून भाजपच्या माध्यमातून महिलांचा आवाज बुलंद करणार असे ज्योती पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी 25 तरुणांनी सुद्धा यावेळी भाजप मध्ये प्रवेश केला.


         सौ.ज्योती राजकांत पाटील यांच्या सोबत निशिगंधा तेली,सत्यवती राहटे, कमल असवले, सुचीता राबडे, अनिता सपकाळ, स्मिता मोहन निवाते, सारिका धनवडे, अश्विनी भुते, वैशाली चव्हाण, अनुष्का पाजवी, मंदा जाधव, श्रद्धा मोहिते, राणी विश्वकर्मा, अस्मिता गुप्ता, पूनम जाधव,मंगल पवार, अनुष्का मणियार, प्रज्ञा जगताप,तेजस्विनी मिस्त्री यांसह सुमारे 300 महिलानी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.


         या वेळी व्यासपीठावर ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत, अशोक पाटील, ठाणे कार्यकारणी सदस्य विजय भोईर, गणेश भगत, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर,सरचिटणीस समीर चव्हाण, सरचिटणीस युवराज यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर,ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत,उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग,व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, माझी महिला अध्यक्ष सीमा भगत, राजश्री मुंडे, सपना भगत, रेणू यादव, शीला गुप्ता,अंकुश मढवी, महेंद्र भगत, प्रकाश पाटील, अशोक सोलंकी, सुदेश पाटील, आशिष पाटील, नीलेश भोईर, सुमीत मढवी, दुर्गेश मढवी, ऋषिकेश अलीमकर, आकाश भोईर, प्रणव भोईर, विपिन भोईर, गौरव पाटील, पंकज सिंग,  जिलाजीत तिवारी, अमरनाथ गुप्ता, धर्मेंद्र विश्वकर्मा, प्रफुल साळवी, विरेंद्र गुप्ता, महेंद्र विश्वकर्मा, क्रांतिसिंह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments