रहीम ११ संघाने पटकावला अलका सावली प्रतिष्ठान चषक


कल्याण : अलका सावली प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांच्या माध्यमातून दोन दिवसीय भव्य अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन गॅलक्सी मैदान, एव्हरेस्ट नगर याठिकाणी करण्यात झाले होते. यामध्ये रहीम ११ संघाने अलका सावली प्रतिष्ठान चषक पटकावला.


 दोन दिवसीय स्पर्धेत पहिल्या दिवशी कल्याण पूर्व गटात ८ संघामधून रहिम ११ संघ व दुसया दिवशी कल्याण पश्चिम गटात  ८ संघांमधून जीतेन साई गणेश संघ यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात दमदार  खेळाच्या जोरावर रहिम ११ संघाने जीतेन जीतेन साई गणेश संघाला पराभूत केले. प्रथम विजेत्या संघाला २५ हजार रोख व चषक तर द्वितीय विजेत्या संघास १५ हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.


या स्पर्धेला युट्युब लाईव व इनडिजिटल केबलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. कल्याण (प) चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि. कांबळे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मान्यवरांनी सुधीर वायले व संस्थेचे कौतुक केले.


 या स्पर्धेच्या यशासाठी अलका सावली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वसामान्य खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती यावेळी सुधीर वायले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments